*चैत्र चाहूल २०२६ चे 'ध्यास' आणि रंगकर्मी सन्मान जाहीर!**'सुदर्शन रंगमंच'च्या शुभांगी दामले यांना 'ध्यास सन्मानाने' तर प्रख्यात लेखक आणि भाष्यकार सुरेश गोसावी यांचा 'रंगकर्मी सन्मानाने गौरव!


*चैत्र चाहूल २०२६ चे 'ध्यास' आणि रंगकर्मी सन्मान जाहीर!*
*'सुदर्शन रंगमंच'च्या शुभांगी दामले यांना 'ध्यास सन्मानाने' तर प्रख्यात लेखक आणि भाष्यकार सुरेश गोसावी यांचा 'रंगकर्मी सन्मानाने गौरव!*

*मुंबई(९ मार्च २०२६) :* गेली दोन दशके गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर “चैत्र चाहूल” हा मराठी संस्कृती आणि मराठी भाषेला वाहिलेला कार्यक्रम 'ॲड फिझ' करतो. यानिमित्ताने काही दिग्गज कलाकारांचे ऋण सत्कार आणि कलेसाठी अवघे आयुष्य समर्पित करणाऱ्यांना “ध्यास सन्मानाने” गौरविले जाते. यंदाचा हा सोहळा गुरुवार दिनांक १९ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवीं, मुंबई येथे संपन्न होणार आहे. 

आत्तापर्यंत या दिग्गजांना चैत्र चाहूल मध्ये गौरविले गेले.  
गेल्या एकोणीस वर्षात ज्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली ते मान्यवर: सुलभाताई देशपांडे, गुरू पार्वती कुमार, राजा मयेकर, मधुकर तोरडमल, प्रा. शंकर वैद्य, सुलोचना चव्हाण, प्रा. वामन केंद्रे, अभिराम भडकमकर, प्रकाश खांडगे, सूनिल शानबाग, संध्या पुरेचा आणि ज्यांचा सन्मान केला ते ध्यास पुरस्कार: अरुण होर्णेकर, संजना कपूर, गणपत म्हसगे, चंद्गकांत काळे, माधुरी पुरंदरे, अरुण काकडे, कांचन सोनटक्के, अविनाश गोडबोले, ओमप्रकाश चव्हाण, सुधीर नांदगावकर, विदयाधर निमकर, अतुल पेठे रंगकर्मी पुरस्कार : मुक्ता बर्वे, प्रदीप मुळये, प्रसाद ओक, विजय केंकरे, विजयकुमार नाईक, चंद्रकांत कुलकर्णी, दत्त्ता पाटील, अजित भगत, विश्वास सोहनी, फैयाज शेख, मनोहर गोलांबरे. 

यंदा पुण्याच्या 'सुदर्शन रंगमंच'च्या शुभांगी दामले यांचा 'ध्यास सन्माना'ने आणि प्रख्यात लेखक आणि भाष्यकार सुरेश गोसावी यांचा 'रंगकर्मी सन्माना'ने गौरव करण्यात येणार आहे.

'चैत्र चाहूल'च्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या विषयावर मनोरंजनाचा सोहळा होतो. यंदाचे वर्ष ही त्याला अपवाद नाही. यावर्षी विद्याधर पुंडलिक यांच्या माळ या कथेचे अभिवाचन प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले सादर करणार आहेत. सृजन संस्कार आणि प्रकाश योजना प्रदीप मुळ्ये यांची आहे आणि संगीत राहुल रानडे यांचे आहे.

डॉ अश्विनी भिडे-देशपांडे यांचा खास 'चैत्र चाहूल' साठी निर्माण केलेला “रंग विठ्ठल“ हा अभंगाचा कार्यक्रम उत्तरार्धात असेल. त्याला साथ देतील तबला - यती भागवत, संवादिनी- ज्ञानेश्वर सोनवणे, तालवाद्य - सुर्यकांत सुर्वे, पखवाज- हनुमंत रावडे, बासरी - अमर ओक, स्वरसाथ- निमिष कैकाडी, स्वरांगी मराठे, स्वराली जोशी.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून काही रांगा आरक्षित असून प्रथम येणाऱ्यांस प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. 
अधिक माहितीसाठी संपर्क : महेंद्र पवार ९८६९२८७८७०

गुढी पाडवा 
गुरुवार दिनांक १९ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता 
रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवीं, मुंबई 

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य