अल्केम लॅबोरेटरीजचे भारतात सेमाग्लुटाइड इंजेक्शन लाँच;
अल्केम लॅबोरेटरीजचे भारतात सेमाग्लुटाइड इंजेक्शन लाँच;
साप्ताहिक उपचार खर्च फक्त ₹450 पासून सुरू
• अल्केमचे सेमाग्लुटाइड प्री-फिल्ड डिस्पोजेबल इंजेक्शन पेनमध्ये उपलब्ध असून, त्यामध्ये महिन्याभरासाठी चार डोस आहेत. याची किंमत ₹1,800 पासून सुरू होते.
• उच्च देखभाल डोससाठी अल्केमकडून पुन्हा वापरता येणारे इंजेक्शन पेन देखील उपलब्ध
पुणे, 2४ मार्च 2026: अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड यांनी आज भारतात “Semasize”, “Obesema” आणि “Hepaglide” या ब्रँड नावांखाली टाईप २ मधुमेहीसाठी सेमाग्लुटाइड इंजेक्शन लाँच केल्याची घोषणा केली. सेमाग्लुटाइड हे आठवड्यातून एकदा त्वचेखाली (सबक्युटेनियस) दिले जाते.
कंपनीने प्री-फिल्ड डिस्पोजेबल इंजेक्शन पेन ₹1,800 प्रति महिना या प्रारंभिक किमतीत सादर केले आहे. ज्यामुळे साप्ताहिक खर्च ₹450 इतका होतो. परवडणाऱ्या किमतीमुळे उपचार सुरू करण्यातील अडथळे कमी होतील आणि भारतात या उपचाराची उपलब्धता वाढेल, असा अल्केमचा उद्देश आहे.
अल्केमला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून टाइप 2 डायबेटीस मेलिटस आणि दीर्घकालीन वजन व्यवस्थापनासाठी (आहार आणि व्यायामासोबत पूरक उपचार म्हणून) सेमाग्लुटाइडचे उत्पादन आणि विपणन करण्यास मान्यता मिळाली आहे. ही मान्यता भारतात घेतलेल्या फेज 3 क्लिनिकल चाचण्यांच्या परीक्षणानंतर देण्यात आली आहे. सेमाग्लुटाइड हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरायचे औषध आहे.
डिस्पोजेबल पेन व्यतिरिक्त, उच्च देखभाल डोससाठी अल्केमकडून पुन्हा वापरता येणारे इंजेक्शन पेन देखील उपलब्ध आहे. या पेनमध्ये फक्त औषधाचा कार्ट्रिज बदलावा लागतो, ज्यामुळे खर्च कमी होतो आणि रुग्णांचा उपचारांप्रती सातत्य वाढण्यास मदत होते.
लाँचबाबत बोलताना, अल्केमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास गुप्ता म्हणाले, “उपचारातील प्रगती प्रत्यक्षात रुग्णांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. आमच्या देशात विकसित केलेल्या सेमाग्लुटाइडच्या लाँचद्वारे आम्ही उच्च दर्जाचा आणि परवडणारा पर्याय बाजारात आणत आहोत. आमच्या मजबूत वितरण जाळ्याद्वारे आणि रुग्णांसाठी सोयीस्कर उपकरणांमुळे अधिकाधिक लोकांपर्यंत हे उपचार पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
Comments
Post a Comment