श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सवात' सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा गौरव !* *सद्गुरु स्वाती खाडये यांनी स्वीकारला सन्मान !*



*'श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सवात' सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा गौरव !* 

*सद्गुरु स्वाती खाडये यांनी स्वीकारला सन्मान !*

  *पुणे* - दत्त परंपरेतील महान संत आणि शक्तिपात योगाचे अध्वर्यू प.पू. गुळवणी महाराज यांच्या दीक्षा शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या अद्वितीय धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यासाठीचा हा सन्मान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वतीने सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी स्वीकारला. शाल, श्रीफळ, मोत्यांची माळ आणि सन्मानचिन्ह असे सन्मानाचे स्वरूप होते. पुण्यातील एरंडवणे येथील ‘श्रीवामन निवास’ येथे ‘श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सव (२०२०-२०२६)’ हा दिमाखदार सन्मान सोहळा पार पडला. 

 हा महोत्सव अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरला. श्रीवासुदेव निवास स्थापनेचा हीरक महोत्सव, प.पू. ब्रह्मश्री श्रीदत्त महाराज कवीश्वर पुण्यतिथी रौप्य महोत्सव, प.पू. योगतपस्वी श्रीनारायणकाका ढेकणे महाराज जयंती शताब्दी महोत्सव, विद्यमान उत्तराधिकारी पू. शरदभाऊ जोशी यांचा ‘योगभक्ती अमृत महोत्सव’ होता. 

 या प्रसंगी भारतभरातील २६ संतांचा सन्मान करण्यात आला. समाजाला सन्मार्ग दाखवण्याचे कार्य करणाऱ्या सत्पुरुषांचे आशीर्वाद मिळावेत, या उदात्त हेतूने ‘श्री प.पू. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प.पू. श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज ट्रस्ट’च्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात उपस्थित संतांनी साधनेचे महत्त्व अधोरेखित केले.

 कार्यक्रमाचा प्रारंभ वेदमंत्रपठण, पादुकापूजन आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषाने झाला. समारोप प.पू. टेंबे स्वामी विरचित ‘दत्त त्रिपदी’च्या व्हायोलिन वादनाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्री. शिरीषकुमार आणि श्री. अरुणकुमार उपाध्ये यांनी हे वादन सादर केले.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य