सुवर्णा माने यांची अनिवासी भारतीय सेलच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षपदी नियुक्ती.
सुवर्णा माने यांची अनिवासी भारतीय सेलच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षपदी नियुक्ती.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनिवासी भारतीय सेलच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे नियुक्तीपत्र नगरसेवक व स्थायी समिती सदस्य प्रशांत जगताप व प्रदेश काँग्रेस अनिवासी भारतीय विभागाचे अध्यक्षा विद्या कदम यांच्या हस्ते डेक्कन भांडारकर रोड येथील रविराज हॉटेलमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये देण्यात आले. महिलांचे कुटुंबाबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील मोठे योगदान आहे असे प्रतिपादन विद्या कदम यांनी केले.
यावेळी ॲड, धनंजय बुद्धिवंत, प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक ख्रिश्चन विभागाचे अध्यक्ष डॉ मॅन्युअल डिसोजा, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव अर्चना शहा, राज्य महिला सचिव मेघा शेगर, महिला राज्य उपाध्यक्षा ॲड, रेखा माने, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष मुमताज शेख, निवृत्त पोलीस निरीक्षक आनंद जंगम, अलिशा बुद्धिवंत, वनिता जाधव आदि यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment