द वंडर स्कूलतर्फे ‘द अनलेबलिंग कॉन्फरन्स २०२६’चे आयोजन; समावेशक शिक्षणासाठी वर्षभराच्या उपक्रमाची सुरुवात

द वंडर स्कूलतर्फे ‘द अनलेबलिंग कॉन्फरन्स २०२६’चे आयोजन; समावेशक शिक्षणासाठी वर्षभराच्या उपक्रमाची सुरुवात

पुणे, २४ मार्च २०२६: द वंडर स्कूल (TWS) तर्फे, आविष्कार इन्क्लुजन सेंटरच्या सहकार्याने, शनिवार दि. २८ मार्च २०२६ रोजी ‘द अनलेबलिंग कॉन्फरन्स २०२६’चे आयोजन करण्यात येणार आहे. या परिषदेद्वारे ‘द अनलेबलिंग प्रोजेक्ट – “डिस्कव्हरिंग स्ट्रेंथ, डिस्कव्हरिंग डिझायनिंग पाथवेज़” या वर्षभर चालणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश न्यूरोडायव्हर्सिटीबाबत प्रचलित समजुतींना आव्हान देत, घर आणि शाळांमध्ये मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नव्याने मांडणे हा आहे. अनेक ठिकाणी मुलांना “मंद”, “अतिचंचल”, “अवघड” किंवा “वेगळे” अशा लेबल्सद्वारे ओळखले जाते. या लेबल्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असला तरी, त्यामुळे मुलांच्या क्षमतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन मर्यादित होऊ शकतो. या उपक्रमाद्वारे द वंडर स्कूल नकारात्मकतेकडून सामर्थ्याकडे, एकटेपणाकडून सन्मानाकडे आणि विस्कळीत सहाय्यापासून संरचित व परिणामकारक मार्गदर्शनाकडे बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहे.

या परिषदेबाबत बोलताना द वंडर स्कूल, पुणेच्या संचालिका अनामिका दासगुप्ता म्हणाल्या, “प्रत्येक मुलाची शिकण्याची आणि जग अनुभवण्याची पद्धत वेगळी असते. लेबल्स ही गुंतागुंतीची गोष्ट सोपी करून दाखवतात. ‘द अनलेबलिंग प्रोजेक्ट’च्या माध्यमातून आम्ही पालक आणि शिक्षकांना या लेबल्सच्या पलीकडे पाहण्यास, प्रत्येक मुलाच्या सामर्थ्यांची ओळख करून त्यांना आत्मविश्वास आणि सन्मानाने पुढे जाण्यासाठी योग्य मार्ग निर्माण करण्यास प्रेरित करू इच्छितो. ही परिषद अधिक संवेदनशील आणि माहितीपूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल.”

ही अर्धदिवसीय परिषद पालक, शिक्षक, मानसशास्त्रज्ञ, थेरपिस्ट, डॉक्टर्स आणि समावेशक शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणणार आहे. या कार्यक्रमात की-नोट सत्रे, गैरसमज दूर करणाऱ्या चर्चा, संवादात्मक कार्यशाळा आणि अनुभवाधारित शिक्षण सत्रांचा समावेश असेल.

परिषदेत सहभागी होणाऱ्यांना खालील बाबींवर सखोल माहिती मिळणार आहे:

निदानाच्या पलीकडे न्यूरोडायव्हर्सिटीचे आकलन
आत्मविश्वास, भावनिक संतुलन आणि तयारीसाठी लवकर सहाय्याचे महत्त्व
न्यूरोडायव्हर्सिटी आणि गिफ्टेडनेस यांचा परस्परसंबंध
मुख्य प्रवाहातील शिक्षणात मुलांना सन्मानाने आणि योग्य आधारासह यशस्वी होण्यासाठीचे मार्ग

या परिषदेत द वंडर स्कूलचा ‘आविष्कार इन्क्लुजन सेंटर’ (लहान वयातील समावेशक शिक्षण उपक्रम) तसेच ‘प्राग्यम लर्निंग लॅब्स’ (गिफ्टेड शिक्षण कार्यक्रम) यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या दोन्ही उपक्रमांद्वारे लवकर हस्तक्षेपापासून ते गुणवत्ताधारित प्रगतीपर्यंत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण आधार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
‘द अनलेबलिंग कॉन्फरन्स २०२६’ ही केवळ एक परिषद नसून, प्रत्येक मुलासाठी अधिक समावेशक, माहितीपूर्ण आणि संवेदनशील वातावरण निर्माण करण्याच्या व्यापक चळवळीची सुरुवात म्हणून पाहिली जात आहे.

About The Wonder School Pune:
TWS is part of Potters Earth Foundation, a non-profit organization working with students and young adults to find their strengths and opportunities and turn them into meaningful careers and decent work. Potters Earth Foundation has been working in education for 15 years, having worked with more than 2 Lac plus kids to help them make decisions about their career and life. Here every child discovers who they are and what they want to become.
The Wonder School provides a wholesome learning space where every child learns to succeed and lead a fulfilled life. Every TWS child, by the time they complete high school, will be ready for college, ready for a career and ready to live a good life, on their own terms and aligned to their unique potential and talents. The Wonder School aims to prepare every child to lead a fulfilled and successful life, contributing to the community and society.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य