वंचित व दलित घटकांसाठी कायदेशीर मदतीचा उपक्रम; ‘क्षितिज व्हिजन फाउंडेशन’चा पुढाकार*

*वंचित व दलित घटकांसाठी कायदेशीर मदतीचा उपक्रम; ‘क्षितिज व्हिजन फाउंडेशन’चा पुढाकार*

पुणे दि. -- क्षितिज व्हिजन फाउंडेशन हे चॅरिटेबल ट्रस्ट असून वंचित घटकांचे हक्क संरक्षण, सामाजिक आधार आणि सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. समाजातील दुर्बल घटकांना कायदेशीर अडचणींमध्ये योग्य मार्गदर्शन मिळावे व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

या सेवेतून अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, महिला तसेच अन्यायग्रस्त नागरिक यांना विविध कायदेशीर विषयांवर मार्गदर्शन दिले जाणार आहे. जमीन वाद, मालमत्ता व कुळ कायदा, सर्व कोर्टातील महसुली व दिवाणी प्रकरणे, आदिवासी जमीन संरक्षण विषयक बाबी, तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रकरणे यावर तज्ज्ञांकडून सल्ला दिला जाणार आहे.

वंचित घटकांची आर्थिक फसवणूक, DRT, NCLT व प्राधिकरणासमोरील प्रकरणांमध्ये ही मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी श्री. सुबराव पाटील माजी सनदी अधिकारी तसेच महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे माजी अध्यक्ष यांचे मार्गदर्शन असणार आहे. अशी माहिती क्षितिज व्हिजन फाउंडेशनच्या ट्रस्टी अस्मिता पाटील यांनी दिली.

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी १, माहेर, मोदिबाग, शिवाजीनगर, पुणे – १६ येथे भेट द्यावी किंवा ०२०-४५१७१३७१ / ७३६००-१७००१ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन क्षितिज व्हिजन फाउंडेशन कडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य