रेन्टोमोजो लिमिटेडतर्फे आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर



 

 

रेन्टोमोजो लिमिटेडतर्फे आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर

डीआरएचपी लिंक:

https://nsearchives.nseindia.com/corporate/Registration_28032026001032_RentomojoLimited_DRHP.pdf

 

घरगुती फर्निचर आणि उपकरणांसाठीचा सर्वात मोठा ऑनलाइन भाडे आणि सबस्क्रिप्शन प्लॅटफॉर्म रेन्टोमोजो लिमिटेड तर्फे प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) साठी सेबी कडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सादर केला आहे.

 

गीतांश बमानिया हे कंपनीचे प्रवर्तक आहेत.

 

या ऑफरमध्ये 1,500 दशलक्ष रु. (150 कोटी रु.) पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि 28,399,567 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. प्रति इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य 1 रु. आहे.

 

रेन्टोमोजो भारतामध्ये फर्निचर आणि घरगुती उपकरणांसाठी तंत्रज्ञान-आधारित, फुल-स्टॅक डायरेक्ट-टू-कन्झ्युमर (“D2C”) ऑनलाइन रेंटल आणि सबस्क्रिप्शन प्लॅटफॉर्म चालवते. सबस्क्रिप्शन उत्पन्नावर आधारित आर्थिक वर्ष 2025 मध्ये संघटित घरगुती फर्निचर आणि उपकरणे भाडे विभागात (वॉटर प्युरिफायर्स वगळता) अंदाजे 42%–47% वाट्यासह (स्रोत: रेडसीर रिपोर्ट) ही सर्वात मोठी ऑनलाइन भाडे आणि सबस्क्रिप्शन प्लॅटफॉर्म कंपनी आणि बाजारपेठेतील अग्रणी आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 22 शहरांमध्ये 227,511 सक्रिय सदस्यांसह, 21 वेअरहाऊसेस आणि सुमारे 444,486 चौ.फूट वेअरहाऊसिंग क्षेत्र असलेल्या विस्तृत सेवा नेटवर्कचे पाठबळ आहे.

 

कंपनी आपले ऑनलाइन इंटरफेस आणि भारतभरातील 67 एक्सपिरीअन्स स्टोअर्स (30 सप्टेंबर 2025 पर्यंत) यांचा समावेश असलेले ओम्नी-चॅनल प्लॅटफॉर्म चालवते. याद्वारे 728,773 सक्रिय उत्पादनांच्या पोर्टफोलिओमध्ये फर्निचर आणि उपकरणांसाठी लवचिक सबस्क्रिप्शन प्रवेश उपलब्ध करून दिला जातो.

 

कंपनी 11-टचपॉइंट ग्राहक लाईफ सायकल मॉडेल (ऑर्डर, जोखीम मूल्यांकन, वितरण, जोडणी, मासिक संकलन, स्थलांतर, दुरुस्ती, अपग्रेड्स, सबस्क्रिप्शन करार हस्तांतरण, रिव्हर्स लॉजिस्टिक्स आणि परतावा) चालवते. कंपनीने 30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या सहा महिने आणि आर्थिक वर्षे 2025, 2024 आणि 2023 साठी अनुक्रमे 83.91%, 82.82%, 86.43% आणि 91.07% इतक्या ऑक्युपन्सी दरांसह मजबूत अ‍ॅसेट युटिलायझेशन सादर केले आहे. त्यामुळे भांडवली कार्यक्षमता आणि अंदाजे उत्पन्न निर्मिती सक्षम होते.

 

कंपनीचे कामकाजामधील उत्पन्न 30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या सहा महिन्यांसाठी 1,766.09 दशलक्ष रु. (176.61 कोटी रु.) आणि आर्थिक वर्ष 2025 साठी 2,659.59 दशलक्ष रु. (265.96 कोटी रु.) होते, तर पुनर्स्थापित करपश्चात नफा 30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या सहा महिन्यांसाठी 613.75 दशलक्ष रु. (61.38 कोटी रु.) आणि आर्थिक वर्ष 2025 साठी 431.06 दशलक्ष रु. (43.11 कोटी रु.) होता.

 

कंपनी प्राथमिक समभाग विक्रीमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा वापर विविध उद्दिष्टांसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवते. यामध्ये कंपनीने घेतलेल्या काही प्रलंबित कर्जांची त्यावरील जमा व्याजासह परतफेड किंवा अंशतः किंवा पूर्ण पूर्वपरतफेड; तिच्या वेअरहाऊसेस आणि अनुभव स्टोअर्ससाठी (ज्यांना “प्रीमायसेस” असे म्हटले जाते) भाडे किंवा परवाना शुल्काचा भरणा; आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांचा समावेश आहे.

 

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”, आणि BSE सोबत मिळून “स्टॉक एक्स्चेंजेस”) या स्टॉक एक्स्चेंजेसवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

 

मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजर्स लिमिटेड, अ‍ॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वी आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

 


Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य