युद्धस्थितीमुळे अमेरिकेत उभारण्यात येणार्या छत्रपती शिवाजी महाराज, महादजी शिंदे यांच्या स्मारकास विलंब
युद्धस्थितीमुळे अमेरिकेत उभारण्यात येणार्या छत्रपती शिवाजी महाराज, महादजी शिंदे यांच्या स्मारकास विलंब
युद्धस्थितीमुळे अमेरिकेत मार्च 2026 मध्ये उभारण्यात येणार्या छत्रपती शिवाजी महाराज, महादजी शिंदे यांच्या स्मारक आता जुन किंवा जुलै मध्ये उभारणार
पुणे - शौर्य, स्वराज्य आणि स्वाभिमान यांचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि महान मराठा सेनानी महादजी शिंदे यांचा इतिहास आता अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातही चिरस्थायी स्वरूपात झळकावा या उद्देशाने न्यूयॉर्कमधील नामांकित पर्यटनस्थळी हे पुतळे उभारण्याची तयारी केली होती आणि याचा मुहुर्त मार्च 2026 मध्ये होता, परंतू युद्धस्थितीमुळे अमेरिकेत मार्च 2026 मध्ये उभारण्यात येणार्या छत्रपती शिवाजी महाराज, महादजी शिंदे यांच्या स्मारक आता जुन किंवा जुलै मध्ये उभारणार असल्याची माहिती शिंदे सरकार फाउंडेड्ानचे
उत्तमराव शिंदे सरकार यांनी दिली.
शिंदे सरकार फाउंडेड्ान’ आणि छत्रपती रिवाजी महाराज प्रतिष्ठान. न्ययॉर्क’ यांच्या संयुक्त विद्यमाने न्ययॉर्कमध्ये या दोन महान योद्ध्यांचे पुतळे एप्रिल महिन्यात उभारण्यात येणार होते. ज्याची तयारी पुर्ण झाली होती आणि सर्वांना यांचे निमंत्रण ही देण्यात आले होते. परंतु युद्धस्थिती पाहता अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडळाचे प्रतिनिधी कल्याणजी यांनी उत्तमराव शिंदे सरकार यांना दूरध्वनीद्वारे विनंती करत, प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज व श्रीमंत महादजी शिंदे स्मारक कार्यक्रमाची तारीख काही दिवसांसाठी पुढे ढकलण्याची मागणी केली . त्यानुसार
आज शिंदे सरकार फाउंडेड्ानची बैठक झाली आणि या बैठकीत सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन कार्यक्रमाची नवीन तारीख जून किंवा जुलै महिन्यात जाहीर करण्यात येईल. युद्धस्थिती स्थिर झाल्यानंतर सार्वजनिकरित्या कार्यक्रमाची पुढील तारीख जाहीर केली जाईल, असे यावेळी ठरल्याची माहिती उत्तमराव शिंदे सरकार यांनी दिली.
प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांच्याकडून पुतळ्यांचे काम करण्यात आले आहे,शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी दिल्लीचे तख्त काबीज करण्याचे स्वप्र पाहिले होते. ते शिंदे यांनी पर्ण केले. छत्रपतींचे स्वराज्य आणि महादजी शिंदेंची यांची ओळख जगभर व्हावी तसेच, त्यातून नागरिकांना प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. छत्रपती महादर्जीया उपक्रमाची संकल्पना उत्तमराव शिंदे सरकार यांची आहे. या उपक्रमास केंद्र आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक सहकार्य घेण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी मोठा आर्थिक खर्च येणार असून, सर्वाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे शिंदि सरकार यांनी सांगितले.
Comments
Post a Comment