तिसऱ्या पुणे सिटी अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत राज तिवारी, रविना गायकवाड, साक्षी भंडारी, सौरभ मेहरा यांना विजेतेपद

तिसऱ्या पुणे सिटी अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत राज तिवारी, रविना गायकवाड, साक्षी भंडारी, सौरभ मेहरा यांना विजेतेपद 

पुणे, 1 मार्च 2026: 'द पूना क्लब लिमिडेट' यांच्या संकल्पनेतून दोराबजी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे एक्झिक्युट केलेल्या व सदर्न कमांड पुणे यांच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या पुणे सिटी अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत राज तिवारी, रविना गायकवाड, दिनकर महाले, ज्योती गवते, साक्षी भंडारी, सौरभ मेहरा, ज्योती ठाकरे , चिंतामण गायकवाड यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.

स्पर्धेत 15000 हुन अधिक धावपटूंनी आपला सहभाग नोंदवला होता. 21.1 किमी पुरुष 18 ते 30 वयोगटात राज तिवारीने 01.08.11सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. तर, महिला गटात रविना गायकवाड हिने 01.27.45 सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद पटकावले. 

10 किमी 18 ते 30 महिला वयोगटात साक्षी भंडारी हिने सेकंद वेळ नोंदवत विजेतेपदाचा मान पटकावला. तर, पुरुष गटात सौरभ मेहराने 30.56 सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद मिळविले. 
 
स्पर्धकांना 21.1 किमी साठी पुणे रेस कोर्स येथून सुरुवात होणार असून अरुण खेत्रपाल रोड, जिजामाता रोड, घोरपडी रोड, बंड गार्डन पोलीस चौकी, रेसिडेन्सी क्लब, अशोक रोड, सदर्न कमांड मार्गे, मनोज पांडे एनक्लेव्ह, लष्कर पोलीस स्टेशन रोड, हायलँड इव्ह, परेड ग्राउंड रोड, गुरुद्वारा रोड, रेस कोर्स ऑफिस येथून पुन्हा पुणे रेस कोर्स मैदान असा मार्ग पूर्ण करावयाचा होता.

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिक व सहभागींना पदक आणि प्रमाणपत्र, रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुना क्लबचे अध्यक्ष गौरव गढोक, दोराबजी चॅरिटेबल ट्रस्टचे जहांगीर दोराबजी, क्लबच्या समितीचे सदस्य व रेस डायरेक्टर शैलेश रांका, क्लबच्या क्रीडा विभागाचे अध्यक्ष व समिती सदस्य तुषार आसवानी यांच्या हस्ते करण्यात आले. दोराबजी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी एक्झिक्युट केले होते. स्पर्धेला सदर्न कमांड पुणे, पुणे इन्कम टॅक्स, पुणे पोलिस दल, पुण्याचा जीएसटी विभाग आणि पुणे महानगरपालिका यांचे सहप्रायोजकत्व लाभले होते. 

निकाल: 
21.1 किमी पुरुष (18 ते 30 वयोगट): 1. राज तिवारी (01.08.11से), 2.अश्विन (01.08.30से), 3. वर्सी राम(01.09.17से);
21.2 किमी महिला (18 ते 30 वयोगट): 1. रविना गायकवाड (01.27.45से), 2. साक्षी जड्याल (01.29.11से), 3. राणी मुचंडी(01.30.10से);21.1 किमी पुरुष (41 ते 50वयोगट): 1.परशुराम भोई(01.13.43से), 2. मल्लिकारुण पारडे(01.27.57से), 3. सुनील शिवणे(01.28.37से);
21.1 किमी महिला (41 ते 50 वयोगट): 1.हिमांगी गोडबोले(01.48.36से), 2.वैशाली गरग(01.51.02से.), 3. श्वेता खेराज(01.51.49से);

21.1 किमी पुरुष (51 ते 65 वयोगट): 1. अनिल टोकरे(01.37.51से.), 2.रमेश चिविलकर(01.38.23से.), 3. बिख्यात देउरी(01.38.29से);
21.1 किमी महिला (51 ते 65 वयोगट): 1. कविता रेड्डी(01.48.44से), 2.क्षीरसागर रामस्मिता(01.59.18से);

10 किमी महिला (18 ते 30 वयोगट): 1. साक्षी भंडारी (36.51से), 2. प्रीती चौहान (37.34 से), 3. आरती भगत(37.53 से);
10 किमी पुरुष (18 ते 30 वयोगट): 1. सौरभ मेहरा (30.56से), 2. अभिषेक देवकाते(30.59से), 3. ईश्वर झिरवाल(31.36से);

10 किमी महिला (31 ते 40 वयोगट): 1. ज्योती ठाकरे (44.33 से), 2. ज्योती चौहान (44.52से), 3. स्वरा अहलुवालिया (46.00से);
10 किमी पुरुष (31 ते 40 वयोगट): 1. चिंतामण गायकवाड (34.35 से), 2. शैलेश गांगोडा (34.44 से), 3. जीवन गुरुंग (36.14 से);

10 किमी महिला (41 ते 50 वयोगट): 1.सायरी दळवी (48.14से), 2.प्रसन्नप्रिया रेड्डी (50.10से), 3.लक्ष्मी झा (51.38 से);
10 किमी पुरुष (41 ते 50 वयोगट): 1.संतू वर्डे (36.42से), 2.नरेश रावत (36.56से), 3.अमित विचारे (41.56से);

10 किमी महिला (51 ते 65 वयोगट): 1.नीतू राणी (01.01.41से), 2.निमिषा नाडकर्णी (01.04.15से), 3.फेय कमिंग्ज (01.05.12से);
10 किमी गट पुरुष (51 ते 65 वयोगट): 1. रणजित कणबरकर (40.44से), 2. मेहताब सिंग (48.08से), 3. देवेन सिक्वेरा (49.06से)


  

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य