सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात* कॉफी विथ ह्या कार्यक्रमाचे हे दुसरे सत्र *Coffee with यशोमतीताई* ठाकूर ह्याच्या रूपाने पार पडले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात* कॉफी विथ ह्या कार्यक्रमाचे हे दुसरे सत्र 
 *Coffee with यशोमतीताई* ठाकूर ह्याच्या रूपाने पार पडले.
अमेरिकन राजकीय Look Alike ह्या थेअरी नुसार, सामान्य लोकांच्यात त्याच्या सारखे होवून नेत्यांनी मिसळे पाहिजे तरच नेत्यांचा स्विकार हा लोकांकडून होवू शकतो, आणि एकदा का स्वीकार झाला कि मग विचारांचा स्विकार ही स्वाभाविक प्रक्रिया बनून जाते हा ह्या कार्यक्रमाचा उद्देश. आज यशोमती ताईच्या प्रत्येक उत्तराला लोकांकडून मिळणाऱ्या टाळ्या हे त्या स्वीकारले जाण्याचे उदाहरण होते. लोकांनी पक्षांवर अनेक टीका करणारे प्रश्न विचारले पण हसत ती टीका स्वीकारत लोकांचे प्रेम आहे, अपेक्षा आहे आमच्याकडून म्हणून लोक बोलतात हे म्हणणे म्हणजेच look alike लोकांसारखे होने होय, हेच म्हणजे तुम्ही लोकनेता होने होय.
भाजपा कडून सुरु असलेल्या धार्मिक द्वेषाच्या प्रश्नाला उत्तर देताना बद्दल ताई बोलता बोलल्या कि
 *“तिरंगा हाच आपला धर्म आहे — असं समजायचं आणि कामाला लागायचं.”* 
या एका वाक्यातूनच काँग्रेस विचारांची मुळे किती भक्कम पणे ह्या नेत्याच्या हृदयात उतरली आहेत हे कळते.
UGC बिला संदर्भात विचारल्या गेलेल्या एका प्रश्नावर ताई बोलल्या कि
 *“निळ्यावर आणि तिरंग्यावर प्रेम करणारे आपणच आता हा देश वाचवू शकतो.”* हे ठाम पणे ताई ने सांगितल्यावर बराच वेळ फक्त टाळ्या वाजत होत्या.
आंबेडकरवाद, समाजकारण, राजकारण ह्याच्या गप्पा रंगल्या असताना,ताई म्हणाल्या कि
 *“आंबेडकरवादी पक्ष हा काँग्रेसच आहे.”* 
लोकनेता यशोमती ताईंनी आज स्पष्ट केले कि सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांचा वारसा
कोणाकडे आहे.NSUI आणि युवक काँग्रेस च्या लोकांना निवडणुकीत संधी मिळत नाही ह्या प्रश्नावर चर्चा करताना ताई बोलल्या कि आता काळजी करू नका मी तुमच्यासाठी संघर्ष करेन पण लक्षात ठेवा
“ *तुम्हाला संधी मिळत नसेल, तर ती तुम्हालाच हिसकावून घ्यावी लागते.”* 
हा केवळ संवाद नव्हता,
तर विद्यार्थ्यांना दिलेली संघर्षाची आणि आत्मसन्मानाची हाक होती.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर उभं राहून,
निर्भीडपणे उत्तर देणं 
हेच आहे संवेदनशील आणि लढवय्या नेतृत्व आहे. ताई ने आज स्पष्ट केले कि आमचा विश्वास संवादावर आहे, आमचा विश्वास लोकांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर देण्यावर आहे, आमचा विश्वास निर्भीड लोकशाहीवर आहे.
 *#धन्यवाद लोकनेता यशोमती ताई ठाकूर#* 

जय भीम,जय शिवराय,जय संविधान!

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य