विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण शिक्षणातून स्वतः उभे रहावेकेरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे विद्यार्थ्यांना आवाहनफ्युएल शिक्षण संस्था समूह तर्फे वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल्स समिट



विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण शिक्षणातून स्वतः उभे रहावे
केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
फ्युएल शिक्षण संस्था समूह तर्फे वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल्स समिट

पुणे, दि. ६ फेब्रुवारी: " विकसीत भारत २०४७ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यांनी कोलोनियन विचारधारेला छेद देणारी नवी शिक्षण निती आणली. भारतीय शिक्षण आणि कौशल्य परिसंस्था मजबूत करण्यासाठी मूल्याधिारित नेतृत्व आणि सहयोगी प्रशासन महत्वाचे आहे. स्किल इंडिया या ब्रीद वाक्यानुसार विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या आधारे स्वतःच्या पायावर उभे राहून नोकरी देणारे बनावे.” असे आवाहन केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.
फ्युएल शिक्षण संस्था समूहातर्फे ‘वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल्स समिट-२०२६’ चे आयोजन फ्युएल कॅम्पसमध्ये करण्यात आहे. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी फ्युएल शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे,  सीओओ मयुरी देशपांडे  व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिक्षण क्षेत्रातील अद्वितीय कार्याच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती करण्यासाठी डॉ. केतन देशपांडे यांचा विशेष सत्कार राज्यापाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच भारताच्या सोशल स्टॉक एक्सचेंज फ्रेमवर्क अंतर्गत फ्यूएलच्या महत्वाच्या टप्पांची घोषणा केली. 
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर म्हणाले," फ्यूएलच्या प्रयत्नामुळे देशभरातील वंचित आणि पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी आकांक्षा आणि रोजगारक्षमता यांच्यातील दरी अर्थपूर्णपणे कमी झाली आहे. फ्यूएल शिक्षण संस्था  आगामी जागतिक दर्जाचे शिक्षण, कौशल्य आणि उद्योग यांना एकत्रित करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत आहे. भारताच्या भविष्यासाठी सज्ज प्रतिभा परिसंस्था आणखी मजबूत करेल.”"समाजाने काय दिले यापेक्षा आम्ही समाजाला काय देऊ हा विचार करावा. स्वतःसाठी जगला तर मेला, दुसर्‍यासाठी जगाला तर जगला हे ब्रीद वाक्य कायमच विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे असे ही त्यांनी सांगितले.”
डॉ. केतन देशपांडे म्हणाले, "प्रतिभा ही सर्वत्र असते परंतु योग्य संधी मिळत नाही. फ्यूएलचा गेल्या २० वर्षाच्या प्रवासात असे आढळते की जेव्हा कौशल्यपूर्ण शिक्षण व सन्मान हे रोजगाराशी जोडले जाते तेव्हा वंचित तरुण भारताच्या विकासात आत्मविश्वासाने योगदान देणारे बनू शकतात.”
व्हिडीओच्या माध्यमातून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संदेश दिला की, " नव्या शिक्षण धोरणात कौशल्य विकासातून उद्योगधंद्यासाठी योग्य दिशा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. फ्युएल गेल्या दोन दशकांपासून शिक्षण आणि युवा विकासाच्या क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करीत आहे. शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करण्यासाठी त्यांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. उद्योपतींकडून सीएसआरच्या माध्यमातून ५ टक्के भाग घेऊन त्याला शिक्षणात परिवर्तनकरणे व त्यातून हुशार विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण विकासातून नोकरी अथवा उद्योगधंदयासाठी तयार केले जाते.”
सानिका निर्मळ यांनी सूत्रसंचालन केले.


Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य