जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त नूमवित हस्ताक्षर स्पर्धा व सुलेखन कार्यशाळा . .

जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त नूमवित हस्ताक्षर स्पर्धा व सुलेखन कार्यशाळा . .

शि . प्र . मंडळींच्या नूमवि प्रशालेत जागतिक हस्तक्षर दिनानिमित्त सुलेखन स्पर्धा व अक्षर रसिक सुलेखन कार्यशाळा नुकतीच आयोजित केली होती .डिजिटल युगात हाताने लिहिण्याची कला (हस्तलेखन ) टिकवून ठेवणे आणि सुलेखनाचे महत्त्व अधोरेखित करणे यासाठी प्रशालेत इयत्ता 5 वी ते 9 वीच्या 700 विद्यार्थ्यांसाठी अक्षर रसिक सुलेखन कार्यशाळा व हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली .

   संगणक आणि मोबाईलच्या युगात लोप पावत चाललेल्या हस्ताक्षर कलेला संजीवनी देणे ,हस्ताक्षरामुळे स्वतःचे वेगळेपण सिद्ध होते. तसेच पेनने लिहिताना बोटांची हालचाल ही ज्ञान वृद्धीसाठी, भाषा प्रभूत्व वाढीसाठी आणि मेंदूच्या संदेश वाहनाच्या दृष्टीने महत्त्वाची असते . स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिण्याने निर्मिती क्षमता वाढते ,अविष्कार कुशलता वाढते, विचार क्षमता, स्मरणशक्ती, भाषा प्रभुत्व यासाठी मेंदू अधिक कार्यक्षम होतो .
रामदास स्वामींनी 450 वर्षांपूर्वी सुरेख अक्षरात लिहिलेली दासबोध मध्ये एक स्वतंत्र समास लिहून या सुलेखनाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले आहे .
या हस्ताक्षर स्पर्धेतील खालील विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे
1) चैतन्य दिवटे 8A
2) आयुष पाटणे 7 A
3) वेदांत शिगवण 7A
4) सोहम शिंदे 9 वी
5) हिमानी पायगुडे 5 वी
6) ज्ञानराज शिंदे 7 वी
7) स्वराज लंगर 9 वी
8 ) अथर्व लांडगे 7 वी
9 ) चैतन्य साळेकर 8 वी
10 ) तेजस ओव्हाळ 9 वी

या स्पर्धेचे नियोजन व परीक्षण प्रशालेचे चित्रकला विभाग प्रमुख श्री .दत्तात्रय वेताळ यांनी केले तर सुलेखन कार्यशाळेस हस्ताक्षर अभ्यासक श्री .शैलेश जोशी यांनी मार्गदर्शन केले .

या हस्ताक्षर स्पर्धेस
शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री पराग ठाकूर साहेब मुख्याध्यापक श्री प्रकाश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले .
उपमुख्याध्यापिका सौ . स्मिता कांगुणे पर्यवेक्षक श्री द .दा . राजगुरू व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य