ईश्वरपुरम् संस्थेचा वार्षिक उत्सव राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न


ईश्वरपुरम् संस्थेचा वार्षिक उत्सव राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

पुणे, दि. ११ फेब्रुवारी, २०२६ : ईश्वरपुरम् संस्थेचा प्रतिवर्षी जानेवारी अखेर होणारा वार्षिक उत्सव नुकताच महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या आवारात संपन्न झाला.

भारताच्या पूर्वोत्तर भागातील नागालैंड व अरुणाचल प्रदेशातील ४० विद्यार्थी सध्या ईश्वरपुरम् संस्थेच्या वसतीगृहात असून शेजारीच असलेल्या लोकसेवा प्रतिष्ठानच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हे विद्यार्थी शिकतात. ईश्वरपुरम् संस्थेचे काम आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यास व क्रीडा विषयक प्रगती पाहून मंत्री महोदयांनी आज समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विनीत कुबेर, कार्यवाहक बाळासाहेब चांदेरे, विश्वस्त संदीपजी पुरकर, कोषाध्यक्ष प्रशांत जोशी त्याचप्रमाणे लोकसेवा प्रतिष्ठानचे माजी आमदार दीपक पायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात नारायणगाव येथील कृषी मित्र अनिल मेहेर हे खास उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या कामाची पाहणी करून संस्थेला आवश्यक तेव्हा मदत करण्याचे आश्वासन दिले.

ईश्वरपुरमच्या नागालैंड आणि अरुणाचलच्या विद्यार्थ्यांनी 'हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे' हे मराठी गीत सादर करून कार्यक्रमाच्या अखेरीस संपूर्ण वंदे मातरम गायले. यावेळी सर्वच उपस्थितांनी त्यांचे कौतुक स्वीकारले.

यावर्षी ईश्वरपुरम् संस्थेला पुणे शहरातील विविध संस्था व व्यक्तींनी आवश्यक आर्थिक सहाय्य केल्यामुळे संस्थेमध्ये विविध योजना राबवल्या जात आहेत. खा. मेधाताई कुलकर्णी यांच्या खासदार निधीतून संस्थेला २० लाख रुपयापर्यंतचे सहाय्य लाभले, या अंतर्गत येथील विद्यार्थ्यांसाठी सहा हजार चौरस फुटांचे पॉलिहाऊस उभे करणे आणि पेवर ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. याबरोबरच प्रकाश धोका, अभय भुतडा फौंडेशन, विनय फडणीस आणि प्राज इंडस्ट्रीजच्या प्रमोद चौधरी फौंडेशन यांच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या विविध योजनांची माहिती संस्थेचे अध्यक्ष विनीत कुबेर यांनी माधुरी मिसाळ यांना दिली.

माधुरीताई मिसाळ यांनी या संस्थेच्या कामाने प्रभावित होऊन वैयक्तिक दहा लाख रुपयांच्या आर्थिक सहाय्याची घोषणा याप्रसंगी केली.

 

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य