दिल्ली विजय आणि पानिपत बदला विजयसोहळा उत्साहात संपन्न

दिल्ली विजय आणि पानिपत बदला विजयसोहळा उत्साहात संपन्न

पुणे : भारत इतिहास संशोधक मंडळ व श्री देवदेवेश्वर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिल्ली विजय आणि पानिपत बदला विजयसोहळा’ मंगळवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात व गौरवशाली वातावरणात संपन्न झाला. मराठ्यांच्या शौर्य, पराक्रम आणि ऐतिहासिक विजयाची स्मृती जागवणारा हा सोहळा इतिहासप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण केले तसेच माधवराव पेशवे, महादजी शिंदे व तुकोजी होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रमेश भागवत यांनी केले. यावेळी व्यासपीठावर एअर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक (निवृत्त), एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), पांडुरंग बलकवडे, सरकार उत्तमराव शिंदे , दकुमार निकम, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये एअर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक (निवृत्त) आणि एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच पानिपत शौर्यदिनाचा कार्यक्रम महादजी शिंदे छत्री, वानवडी (पुणे) येथे गेली आठ वर्षे सातत्याने आयोजित केला जात असून या उपक्रमाला महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल उत्तमराव शिंदे सरकार यांचा आणि पांडुरंग बलकवडे, पुष्करसिंह पेशवे, अभिमन्यू होळकर, गुरुड रणजितसंह यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे सरकारचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख अतिथी एअर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक यांनी आपल्या मनोगतात मराठ्यांच्या रणनिती, शिस्त आणि राष्ट्रभक्तीचा गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले यांनी पानिपतनंतरच्या मराठा विजयाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करत हा विजय केवळ लष्करी नसून स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा विजय असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश भागवत यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुप्रसाद कानिटकर यांनी केले आणि नंदकुमार निकम यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.

पानिपतच्या युद्धानंतर तब्बल दहा वर्षांनी महादजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा साम्राज्याने दिल्लीवर पुन्हा विजय मिळवला. तुकोजी होळकर, विसाजीपंत बिनीवाले, रामचंद्र कानडे यांच्यासह मराठा सेनानींनी १० फेब्रुवारी १७७७ रोजी दिल्ली जिंकून पानिपतच्या पराभवाचा बदला घेतला. याच मोहिमेत नजीबखान रोहिलाचे राज्य जिंकून नजीबाबाद राजधानीसह घोसगड, पत्रगड हे किल्ले ताब्यात घेण्यात आले. नजीबाबाद येथे नजीबखानाची कबर उद्ध्वस्त करून गंगेत विसर्जित करण्यात आले. हा विजय मराठ्यांच्या शौर्याचा व पराक्रमाचा महत्त्वपूर्ण अध्याय मानला जातो.
-=------
दिल्ली विजय और पानीपत बदला विजय समारोह उत्साहपूर्वक संपन्न
*पुणे : भारत इतिहास संशोधक मंडल और श्री देवदेवेश्वर संस्थान के संयुक्त तत्वावधान में आयोजित ‘दिल्ली विजय और पानीपत बदला विजय समारोह’ मंगलवार सायंकाल बड़े उत्साह और गौरवपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। मराठों के शौर्य, पराक्रम और ऐतिहासिक विजय की स्मृति को जागृत करने वाला यह समारोह इतिहासप्रेमियों के लिए प्रेरणादायी सिद्ध हुआ।

कार्यक्रम की शुरुआत छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर पुष्प अर्पण से हुई। इसके पश्चात माधवराव पेशवा, महादजी शिंदे एवं तुकोजी होळकर की प्रतिमाओं का पूजन कर कार्यक्रम का औपचारिक शुभारंभ किया गया।

कार्यक्रम का प्रास्ताविक श्री रमेश भागवत ने किया। इस अवसर पर मंच पर **एयर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक (सेवानिवृत्त), एयर मार्शल भूषण गोखले (सेवानिवृत्त), पांडुरंग बलकवडे, उत्तमराव शिंदे सरकार, नंदकुमार निकम सहित अनेक गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। इस दौरान मान्यवरों का शाल एवं सम्मानचिह्न देकर सत्कार किया गया। विशेष रूप से एयर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक और **एयर मार्शल भूषण गोखले का विशेष सम्मान किया गया।

साथ ही, पुणे के वानवडी स्थित महादजी शिंदे छत्री में पिछले आठ वर्षों से निरंतर आयोजित किए जा रहे पानीपत शौर्य दिवस कार्यक्रम में महत्वपूर्ण योगदान के लिए उत्तमराव शिंदे सरकार का तथा **पांडुरंग बलकवडे, पुष्करसिंह पेशवा, अभिमन्यु होळकर और रणजितसिंह गुरुड का भी सत्कार किया गया। इस अवसर पर शिंदे सरकार के समर्थक बड़ी संख्या में उपस्थित थे।
प्रमुख अतिथि एयर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक ने अपने संबोधन में मराठों की रणनिति, अनुशासन और राष्ट्रभक्ति की सराहना की। कार्यक्रम के अध्यक्ष एयर मार्शल भूषण गोखले ने पानीपत के बाद मराठों द्वारा प्राप्त विजय के ऐतिहासिक महत्व को रेखांकित करते हुए कहा कि यह विजय केवल सैन्य नहीं, बल्कि स्वाभिमान और आत्मविश्वास का प्रतीक है।

कार्यक्रम का सूत्रसंचालन गुरुप्रसाद कानिटकर ने किया, जबकि नंदकुमार निकम ने आभार प्रदर्शन किया।

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य