मुंबईत थम्स अपच्या नव्या अँथम लॉन्चला हनुमनकाइंड आणि विशाल ददलानींची दमदार उपस्थिती
- Get link
- X
- Other Apps
मुंबईत थम्स अपच्या नव्या अँथम लॉन्चला हनुमनकाइंड आणि विशाल ददलानींची दमदार उपस्थिती
मुंबई, फेब्रुवारी ५, २०२६: भारतातील प्रख्यात बिलियन-डॉलर ब्रँड थम्स अपने नुकतेच हनुमानकाइण्ड व विशाल ददलानी यांच्यासोबत सहयोगाने उत्साहवर्धक 'टेस्ट द थंडर' गाणे लॉंच केले. ब्रँडचा सिग्नेचर तूफानी उत्साह आत्मसात करत टॅगलाइन 'आज कुछ तूफानी करते हैं' या गाण्याचा मुख्य गाभा आहे, जेथे प्रत्येक तालमधून अद्वितीय ऊर्जा आणि उत्साही वृत्ती दिसून येते.
थम्स अपचा हनुमानकाइण्ड व विशाल ददलानी यांच्यासोबतचा सहयोग तरूणांचा उत्साह वाढवतो आणि ब्रँडला साहसी सांस्कृतिक नवप्रवर्तक म्हणून स्थित करतो. थम्स अपची चव आणि तूफानी व्यक्तिमत्त्वाला सादर करत दोन्ही आर्टिस्ट्स तीव्रता, विशिष्टता व उत्तम व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहेत. हनुमानकाइण्ड यांनी या गाण्यामध्ये भारतात दिसण्यात येणाऱ्या आधुनिक हिप-हॉपची भर केली आहे. विशाल यांनी दशकभरापासून असलेली संस्कृती आणि विविध पिढयांमधील रॉक शैली सादर केली आहे. डब्ल्यूपीपी ओगील्व्हीद्वारे संकल्पित आणि युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपसोबत सहयागाने निर्माण करण्यात आलेले टेस्ट द थंडरचे नवीन गाणे तरूणाला काहीतरी वेगळे करण्यास प्रेरित करते.
मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व फक्त आमंत्रण असलेल्या प्रेस व क्रिएटर शोकेसमध्ये हे गाणे लॉंच करण्यात आले. याप्रसंगी हनुमानकाइण्ड, विशाल ददलानी, बिजॉय शेट्टी, सुशीन श्याम आणि वरूण ग्रोव्हर उपस्थित होते. बिजॉय शेट्टीद्वारे दिग्दर्शित हे गाणे उत्तम व्हिज्युअल्स देते, जे भारतातील तरूणांना उत्साहित करते. सुशीन श्याम यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यामध्ये समकालीन, सिनेमॅटिक साऊंड आहे, तसेच वरूण ग्रोव्हर यांची हिंदी गीतरचना तरूणांमधील साहचर्य व सहयोगात्मक ऊर्जेला सादर करते. हनुमानकाइण्ड यांचा इंग्रजीमधील रॅप नीडरपणाची भर करते, ज्यामुळे गाण्याचा साहसी उत्साह प्रत्यक्षात येतो.
या गाण्यामध्ये प्रतिष्ठित क्रीडा व्यक्तिमत्त्व देखील आहेत, जसे क्रिकेटर्स सूर्यकुमार यादव व रिंकू सिंग, ज्यासह थम्स अपचे क्रिकेटसोबत असलेले दीर्घकालीन संबंध अधिक दृढ झाले आहेत. हे गाणे ब्रँडच्या नवीन समर कॅम्पेनला मानवंदना आहे, जी बहुप्रतिक्षित आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कपदरम्यान सुरू होणार आहे. थम्स अप क्रिकेट, सिनेमा व संगीतला एकत्र करत मल्टीमीडिया प्लॅटफॉर्म्समध्ये उत्साहवर्धक मार्केटिंग करत आहे.
कोका-कोला इंडिया व साऊथवेस्ट एशियाच्या मार्केटिंगच्या उपाध्यक्ष ग्रीष्मा सिंग म्हणाल्या, ''तरूण ग्राहक फक्त प्रेक्षक न राहता मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग घेत आहेत. ते उत्साहित करणाऱ्या, जलदपणे पुढे जाण्यास मदत करणाऱ्या आणि वास्तविक वाटणाऱ्या क्षणांचा शोध घेत आहेत. या विश्वासाने 'टेस्ट द थंडर' गाण्याला आकार दिला आहे. 'आज कुछ तूफानी करते हैं'मधून समान ऊर्जा दिसून येते, जी मित्रांना एकत्र आणते आणि त्वरित नवीन उत्साहाची सुरूवात करते. ऑल थिंग्ज तूफानी!''
ओगिल्व्ही इंडियाचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर सुकेश नायक म्हणाले, ''आजचे तरूण फक्त प्रेक्षक नाहीत तर मुख्य प्रवाहात सहभागी होतात. ते झपाट्याने मिळणारे, सर्वोत्तम आणि अनपेक्षितपणे वास्तविक अनुभवांचा शोध घेत आहेत. तसेच, ते या अनुभवांना उद्यावर घेऊन जाण्यास तयार नाहीत, तर आजच या अनुभवांचा एकत्र आनंद घेण्याची इच्छा आहे. उत्साहवर्धक व साहसी कृतीसाठी ही आवड 'टेस्ट द थंडर' गाण्याचा मुख्य गाभा आहे. 'आज कुछ तूफानी करते हैं' टॅगलाइन असण्यासोबत समान साहस, उत्साहपूर्ण कृती आणि मैत्रीच्या उत्साहाचे प्रतीक आहे. ही तूफानीची व्याख्या आहे.''
युनिव्हर्सिटी म्युझिक ग्रुपचे भारतातील अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आफ्रिमा, मिडल ईस्ट व आशियामधील धोरणाचे वरिष्ठ उपाध्यक्ष देवराज सन्याल म्हणाले, ''थम्स अपला ४९ वर्ष पूर्ण होत आहे, जे अत्यंत उत्साहवर्धक आहे. हनुमानकाइण्ड यांची उत्साहपूर्ण ऊर्जा, विशाल ददलानी यांचा मधुरमय आवाज, दिग्गज सुशीन श्याम यांची निर्मिती आणि वरूण ग्रोव्हर यांची हिंदी गीतरचना यामुळे संस्कृती व दृढनिश्चय एकत्र होत असल्यासारखे वाटले. आम्ही निर्माण केलेले नवीन गाणे जिंगलचे नवीन व्हर्जन असण्यासोबत स्टेटमेंट आहे. प्रतिभावान बिजॉय शेट्टी यांच्यासह शूटिंग करण्यात आलेल्या या गाण्याला अर्ली मॅन फिल्म्सचे पाठबळ आहे. माझ्यासाठी काहीतरी अनपेक्षित निर्माण करणे सेलिब्रेशन असण्यासोबत त्यामधून थंडरला नव्या उंचीवर नेण्यात आले आहे. याबाबत मला वाटलेला अभिमान शब्दांमध्ये सांगता येऊ शकत नाही.''
विशाल ददलानी म्हणाले, ''या सहयोगाला धमाल केलेली बाब म्हणजे आमचे संगीत विश्व खूप वेगळे आहे. आम्ही या वेगळेपणाला कमी करण्याचा किंवा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्या वेगळेपणामधून उत्साह जागृत होईल आणि काहीतरी तूफानी निर्माण होईल, याची खात्री घेतली. यामधून खरा रोमांच प्रत्यक्षात आला आणि गाण्याला नवीन वैशिष्ट्य मिळाले.''
हनुमानकाइण्ड म्हणाले, ''आमच्यासाठी हे गाणे सहज असल्याचे वाटले. तुम्ही ऐकत असलेले गाण्याचे व्हर्जन आम्ही स्टुडिओमध्ये एकत्र केलेल्या विचारांशी संलग्न आहे. या गाण्यासाठी प्रतिभावान आर्टिस्ट्स एकत्र आले आणि आता आम्ही तुमच्यासाठी हे गाणे सादर केले आहे.''
बिजॉय शेट्टी म्हणाले, ''आम्ही थम्स अपच्या विश्वाला नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या बाबीला प्राधान्य दिले, ते म्हणजे उत्साहवर्धक अनुभव मिळण्यासाठी पुढाकार घेणे. जाहिरातीमध्ये पाहायला मिळणारी प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांसाठी संगीतासह उत्साह वाढवते.''
दोन दशकांमध्ये ब्रँडच्या पहिल्या प्रमुख व्हिज्युअल उत्क्रांतीला सादर करत थम्स अपने नुकतेच नवीन व्हिज्युअल ओळख व लोगोचे अनावरण केले. अधिक लक्षवेधक, अधिक गतीशील व भविष्यासाठी सुसज्ज असण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या नवीन व्हिज्युअल ओळखीमधून तोच आत्मविश्वास व खासियत दिसून येते, ज्यासाठी थम्स अप दीर्घकाळापासून ओळखला जात आहे. आता या ओळखीला आजच्या तरूणांच्या धाडसी उत्साहाशी संलग्न असण्याच्या रूपात सादर करण्यात आले आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment