ताल-सुरांच्या अनोख्या मिलाफाची मंत्रमुग्ध करणारी सांज

ताल-सुरांच्या अनोख्या मिलाफाची मंत्रमुग्ध करणारी सांज

 

पुणे : स्वर्गीय सुर, मधाळ स्वर तर अत्यंत बोलके भाव, काटेकोर शास्त्रशुध्द मुद्रा, लय, तालाचा संगम साधत मंत्रमुग्ध करणारा पडण्यास द्वारे अवकाशाच्या कॅनव्हासवर आकर्षक चित्र चीतारणारी अनोखी सांज पुणेकर रसिकांनी अनुभवली. निमित्त होते ‘मेलांज’ या कार्यक्रमाचे.

 

ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने आयोजित ‘मेलांज २०१६’ या कार्यक्रमात प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना संध्या मुरलीधरन व ज्येष्ठ गायिका विदुषी अनुराधा कुबेर यांचा कलाविष्कार रसिकांनी अनुभवला. यावेळी ऋत्विक फाउंडेशनचे संस्थापक संचालक प्रवीण कडले, चेतना कडले यांच्यासह अनेक मान्यवर रसिक उपस्थित होते. कोथरूडमदील ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

अभिजात भरतनाट्य मधील पारंपरिक नृत्याविष्कार सादर करत संध्या मुरलीधरन यांनी आदी तालतील राग अरबीमधील गणेश वंदनेची पुष्पांजली अर्पण करत सुरुवात केली. देविस्तुती सादर करत देवीची वेगवेगळी रूपे दाखवली. त्यानंतर कृष्णलीलेचे सादरीकरण करत आपल्या मोहक अदाकारीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. अत्यंत बोलके हावभाव, लयबध्द देहबोली, तालबद्ध पदन्यास यामुळे रसिकांच्या नजरा खिळल्या होत्या. भवमुद्रंमधील काटेकोरपणा, त्याचवेळी जपली जाणारी नजकात रसिकांच्या हृदयाला भिडणारी होती. भक्ती, शौर्य, महाकाली विविध रूपांचे दर्शन यावेळी घडविले. त्यांनी आपल्या कलाविषकराच्या सादरीकरणाचा समारोप तिल्लाना सादर करून केला.

 

कार्यक्रमाचा उत्तरार्ध भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदुषी अनुराधा कुबेर यांच्या सुरेल मैफलीने सजला. भेंडीबाजार घराण्याच्या गायकीचे बारकावे त्यांनी अगदी लीलया सादर केले. राग पुरिया मध्ये विलंबित एकताल आणि दृत तीनतालातील ‘मै तो करी आयी पिया संग रंगरलीया’ ही पारंपरिक बंदिश सादर करून गायनाला सुरुवात केली. भेंडी बाजार घराण्याचा खास मानलेला राग पटबिहागमधील मध्यलय रूपक ‘ए बना ब्याहान आयो री माई' आणि द्रुत एकतालातील रचना ‘मद मदन बावरे’ सादर केली. त्यानंतर मांज खमाज मधील झपतालातील ‘अचानक गहेलीनो मोरी बैय्या’ ही रचना त्यांनी पेश केली. समारोप राग भैरवीतील तीनतालातील ‘देखो मोरी चुरिया करक गैया' या बंदिशीने केला. वेदांग क्षीरसागर (तबला), सौमित्र क्षीरसागर (हार्मोनियम), मृदगंधा व ओवी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

 

कलाकारांचा सत्कार प्रवीण कडले, चेतना कडले यांनी केला.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य