संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला 'नॅशनल इनोव्हेंचर महाराष्ट्रातील नंबर वन' स्कूल पुरस्कार

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला 'नॅशनल इनोव्हेंचर महाराष्ट्रातील नंबर वन' स्कूल पुरस्कार

पुणे, १० फेब्रुवारी २०२६ : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, सर्जनशीलता आणि भविष्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल 'नॅशनल इनोव्हेंचर महाराष्ट्रातील नंबर वन स्कूल अवॉर्ड' प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार समारंभ पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अँड रिसर्च विद्यापीठात उत्साहात पार पडला.

या समारंभात इनोव्हेंचर फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रांजल गुंडेशा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अँड रिसर्च विद्यापीठाचे महासंचालक प्रा. डॉ. तपस गांगुली, तसेच महाराष्ट्र राज्यपालांचे नामवंत वैद्यकीय सल्लागार डॉ. विनोद शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा सन्मान इनोव्हेंचर नॅशनल चॅलेंज 2025-26 या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमातील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या उत्कृष्ट सहभागामुळे मिळाला. इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम इनोव्हेंचर वर्ल्ड फाउंडेशन (इंटेलिजन्स प्लस) यांच्या वतीने आयआयटी हैदराबादच्या उद्योजकता विभाग आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या सहकार्याने राबविण्यात आला होता.

या यशाबद्दल संजय घोडावत शिक्षण समूहाचे चेअरमन संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विशेष कौतुक केले. विश्वस्त विनायक भोसले यांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील शाळेच्या प्रयत्नांचे अभिनंदन केले. तसेच शाळेच्या संचालिका सस्मिता मोहंती यांनी, “हा पुरस्कार शाळेत सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित, संगणक विज्ञान आणि डेटा विश्लेषण यासारख्या क्षेत्रातील करिअरसाठी विद्यार्थ्यांना तयार करून, वैश्विक विचारसरणी, नवोपक्रम आणि वास्तविक जगातील समस्या सोडवण्यावर भर देण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नांची पावती आहे,” अशी भावना व्यक्त केली. यावेळी बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच.एम नवीन, डे बोर्डींग विभागाचे प्राचार्य अस्कर अली उपस्थित होते.

या सन्मानामुळे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात नव्या उंचीला गवसणी घातली असून भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य