गुडलक चौक परिसरातील ‘कलाकार कट्टा’चे स्थलांतर थांबवा,पुणे आयुक्तांना राष्ट्रवादीचे निवेदन - नगरसेवक श्री. हर्षवर्धन मानकर


गुडलक चौक परिसरातील ‘कलाकार कट्टा’चे स्थलांतर थांबवा,पुणे आयुक्तांना राष्ट्रवादीचे निवेदन - नगरसेवक श्री. हर्षवर्धन मानकर 
             पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला ‘कलाकार कट्टा’ स्थलांतर करण्याच्या निर्णयाचा पुर्नविचार करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विरोधीपक्ष नेते अॅड निलेश निकम यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांची भेट घेऊन नगरसेवक श्री. हर्षवर्धन दीपक मानकर यांनी सविस्तर निवेदन दिले. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनाही निवेदन देण्यात आले आहे.  
नगरसेवक श्री. हर्षवर्धन मानकर यांनी निवेदन देताना सांगितले, गेल्या अनेक वर्षापासून “कलाकार कट्टा” हा नवोदित तसेच ज्येष्ठ कलाकारांच्या संवाद,सादरीकरण आणि विचारमंथनाचा महत्त्वाचा मंच राहिला आहे. शहरातील साहित्यिक,नाट्य,संगीत आणि विविध कला क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणणाऱ्या या ठिकाणाचे स्थलांतर न करता जतन करावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत पुण्याची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी कलाकार कट्टा चे स्थलांतरीत करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नगरसेवक श्री. हर्षवर्धन दीपक मानकर यांनी केली. त्यावेळी आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी त्याबाबत नक्की सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. 
सदरप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गटनेते श्री. काका चव्हाण हेदेखील उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य