शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न. समन्वयातून विकासाकडे वाटचाल करत असताना पुणे शहरामध्ये सुरू असलेल्या तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध शहरी उपक्रमांचा वाढता व्याप आणि नागरी सेवा व पर्यावरण व्यवस्थापनातील गुंतागुंत लक्षात घेता, शहरासाठी अत्यंत महत्त्वाची व आवश्यक अशी संस्थात्मक व्यवस्था असावी यासाठी शहर परिवर्तन कक्षाच्या वतीने आज दि. ५/०२/२०२६ रोजी बैठक पुणे महानगरपालिका , स्थायी समिती सभागृह, नवीन इमारत येथे आयोजित करण्यात आली होती.
पुणे महानगरपालिका
०५/०२/२०२६
शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.
समन्वयातून विकासाकडे वाटचाल करत असताना पुणे शहरामध्ये सुरू असलेल्या तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध शहरी उपक्रमांचा वाढता व्याप आणि नागरी सेवा व पर्यावरण व्यवस्थापनातील गुंतागुंत लक्षात घेता, शहरासाठी अत्यंत महत्त्वाची व आवश्यक अशी संस्थात्मक व्यवस्था असावी यासाठी शहर परिवर्तन कक्षाच्या वतीने आज दि. ५/०२/२०२६ रोजी बैठक पुणे महानगरपालिका , स्थायी समिती सभागृह, नवीन इमारत येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी मा. महानगरपालिका आयुक्त श्री.नवल किशोर राम, मा.पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा व्यवस्थापकीय संचालक पुणे मेट्रो श्री श्रावण हर्डीकर, मा.जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र डुड्डी, मा.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (इस्टेट)श्री पृथ्वीराज बी पी, मा.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (जनरल) श्रीमती पवनीत कौर,मा.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (विशेष) श्री ओमप्रकाश दिवटे, मा. मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि., मा. मुख्य अभियंता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मा. मुख्य अभियंता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मा. संचालक पुणे मेट्रो रेल प्रकल्प, अधिक्षक अभियंता जलसंपदा विभाग, प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय, अतिरिक्त आयुक्त वाहतूक पोलीस, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, उपवनसंरक्षक वन विभाग, व्यवस्थापक दूरसंचार सेवा प्रदाते, व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ इ. तसेच विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये शहराच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण विचारविनिमय करण्यात आला.
शहर स्तरावर शहर परिवर्तन कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.यात सर्व विभागाचे नोडल अधिकारी असतील.
यावेळी भूसंपादन बाबत,जिल्हा स्तरावर भूसंपादनासंबंधी बरेच प्रस्ताव प्रलंबित असून त्यावर त्वरित व योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
प्रलंबित प्रकरणांची प्राथमिकता निश्चित करून एक महिन्याच्या आत सर्व प्रकरणे निरस्त/निपटवण्याची जबाबदारी संबंधित विभागांना देण्यात आलेली आहे.
बंद असलेल्या कालव्यांचा वापर सायकल ट्रँकसाठी करण्यास जलसंपदा विभागाशी समन्वय साधून कार्यवाही करावी.
प्रत्येक विभागासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले.जे संबंधित प्रकरणांच्या वेळेवर निकडी नुसार नियोजन व अंमलबजावणी सुनिश्चित करतील.
शहराच्या शाश्वत व समतोल विकास साधण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. पायाभूत व नागरी सुविधा साध्य करताना पर्यावरणीय बाबींचा विचार करणे आवश्यक राहील. असे प्रतिपादन करण्यात आले.
मोजणी प्रक्रियेसंबंधी सखोल चर्चा करून प्रत्येक विभागाने वेळेत व अचूक कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
शहरातील फ्लेक्स होर्डिंग काढण्यासंबंधी समन्वय साधून त्वरित व नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आगामी काळात काही महत्वाचे धोरणात्मक व विकासात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याने संबंधित विभागांनी प्रस्ताव तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुढील एक वर्षात हाती घेतल्या जाणाऱ्या प्रकल्पांचे सर्व कामकाज व प्रस्ताव संबंधित विभागांनी वेळेत कळवावे, जेणेकरून विभागांमध्ये समन्वय राखला जाईल व कुठल्याही कामासाठी किंवा प्रकल्पासाठी, संबंधित विभागाच्या नियोजन व मंजुरीशिवाय कोणतीही परवानगी किंवा अनुमती दिली जाणार नाही जेणेकरून प्रकल्पांचे नियोजन व अंमलबजावणी सुरळीतरीत्या होईल.
शहरातील फुटपाथ वर तसेच हवेत असलेल्या अस्ताव्यस्त विद्युत व दूरध्वनी केबलमुळे होणारा अडथळा त्वरित दूर करण्याच्या सूचना करण्यात आल्या .
बेवारस वाहने रस्त्यात अडथळा निर्माण करीत असल्यामुळे, संबंधित विभागांनी त्वरित कार्यवाही करून ती वाहने रस्त्याहून हटवावी व नियमांनुसार योग्य ती कारवाई सुनिश्चित करावी.
सर्व संबंधित विभागांनी वरील सूचनांचे पालन करावे व त्यावर नियमित अहवाल शहर परिवर्तन कक्षाकडे सादर करणे अनिवार्य असेल.
शहर परिवर्तन कक्षाची बैठक प्रत्येक महिन्यातून एकदा घेण्यात येईल. असे सांगून बैठक संपल्याचे मा.महानगरपालिका आयुक्त श्री.नवल किशोर राम यांनी जाहीर केले.
Comments
Post a Comment