वाय फोर डी फौंडेशन आणि महापारेषण आयोजितरोजगाराभिमुख कौशल्य विकास उपक्रमास प्रारंभ
वाय फोर डी फौंडेशन आणि महापारेषण आयोजित
रोजगाराभिमुख कौशल्य विकास उपक्रमास प्रारंभ
युवा सक्षमीकरण, शिक्षण,रोजगाराद्वारे आर्थिकदृष्ट्या वंचितांना सक्षम बनविणे,आरोग्य,पर्यावरण संवर्धन,आपत्ती प्रतिसाद अशा विविध क्षेत्रात गेली१० वर्षे कार्यरत असणाऱ्या पुण्यातील वाय फोर डी फौंडेशन ही गैर-सरकारी संस्था व महापारेषण (महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी ट्रान्स्मिशन कंपनी)यांच्या सहकार्याने ग्रामीण युवकांसाठी रोजगाराभिमुख कौशल्य विकास उपक्रम सुरु केला आहे.
ग्रामीण भागातील युवकांना तांत्रिक कौशल्यांच्या माध्यमातून स्वावलंबी बनविणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करणे या उदेश्याने दोन्ही संस्थांमध्ये नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील विविध गावांमधून निवडलेल्या १६३ युवकांना उद्योगमान्य व प्रात्यक्षिक-आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे. पीसीबी असेंब्ली ऑपरेटर आणि ऑटोमोटिव्ह असेंब्ली ऑपरेटर या अभ्यासक्रमांचा समावेश असून, तांत्रिक कौशल्यांसोबत सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्व विकास आणि मुलाखत तयारी यांवरही विशेष भर दिला जाणार आहे.
सध्या खंडाळा तालुक्यातील विंग येथे ५५ युवकांसाठी निवासी प्रशिक्षणास सुरुवात झाली असून, दोन महिन्यांत प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. प्रशिक्षणानंतर पात्र उमेदवारांना नामांकित उद्योगांमध्ये प्लेसमेंटची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हा उपक्रम ग्रामीण युवकांना स्वावलंबन, स्थिर रोजगार आणि सामाजिक सक्षमीकरणाचा मार्ग उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.
प्रसाद चौधरी
७८७५८३७५२४
Comments
Post a Comment