बांधकाम कामगारांसाठी गोदरेज प्रॉपर्टीजचा 'गोदरेज सहयोग' हा मानसिक आरोग्य उपक्रम

बांधकाम कामगारांसाठी गोदरेज प्रॉपर्टीजचा 'गोदरेज सहयोग' हा मानसिक आरोग्य उपक्रम

भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट विकासकांपैकी एक असलेल्या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने (जीपीएल) 'गोदरेज सहयोग' या नवीन कामगार उपक्रमाची घोषणा केली आहे. कंपनीच्या प्रकल्पांच्या ठिकाणी काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना मदत करण्यासाठी हा एक सुनियोजित मानसिक आरोग्य आणि कल्याण कार्यक्रम आहे.

यासंदर्भात मुंबई महानगर क्षेत्रातील सहा बांधकाम स्थळांवर सहा महिने प्रायोगिक तत्त्वावर हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. यात मानसिक शिक्षणाच्या माध्यमातून 2,000 हून अधिक कामगारांना सहभागी करून घेण्यात आले होते. आता हा उपक्रम मुंबई, दिल्ली एनसीआर, बंगळूर, चेन्नई, पुणे, हैदराबाद, कोलकाता, गुजरात आणि छत्तीसगड यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमधील 79 निवडक बांधकाम स्थळांवर सुरू केला जाईल, ज्यामुळे अंदाजे 30,000 कामगारांपर्यंत पोहोचता येईल.

या शुभारंभाबाबत गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज म्हणाले, “आपली शहरे आणि पायाभूत सुविधा उभारणाऱ्या लाखो लोकांच्या माध्यमातून भारताचा विकास दररोज आकार घेतो आहे. राष्ट्र उभारणाऱ्यांच्या कल्याणाची काळजी घेणे ही केवळ व्यावसायिक जबाबदारी नाही; तर ती एक सामाजिक गरज आहे. गोदरेज सहयोगच्या माध्यमातून, आम्ही श्रम प्रतिष्ठेला मान्यता देऊ इच्छितो आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्रयत्न करणे, हा सर्वसमावेशक विकास आणि राष्ट्रनिर्माणाबद्दलच्या आपल्या विचारांचा अविभाज्य भाग ठरेल याची खात्री देतो.”

भारतीय शहरांमध्ये मजबूत उपस्थिती असलेली व्यावसायिक मानसिक आरोग्य सेवा पुरवणारी आघाडीची कंपनी 1to1 हेल्पच्या भागीदारीने हा कार्यक्रम राबवला जात आहे.

बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या भावनिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणावर हा कार्यक्रम लक्ष केंद्रित करतो. कारण, येथे काम करणारे बरेच जण आपल्या कुटुंबापासून दूर असतात. प्रशिक्षित मानसिक आरोग्य व्यावसायिकांकडून २४/७ उपलब्ध असलेल्या सेवेद्वारे, हा उपक्रम सातत्यपूर्ण आणि खात्रीशीर आधार प्रदान करतो. कामाच्या ठिकाणी दरमहा गट चर्चासत्रे, वैयक्तिक समुपदेशन आणि समुपदेशन तसेच आपत्कालीन मदतीसाठी चोवीस तास उपलब्ध असलेली दृकश्राव्य हेल्पलाइन यांचा या उपायांमध्ये समावेश आहे.

गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ गौरव पांडे म्हणाले, “आम्ही घरे बांधतो, पण ती बांधतानाच घरे बांधणाऱ्या लोकांची जबाबदारी घेणे, हे देखील आमचे काम आहे, असे मानतो. आमचे अनेक बांधकाम कामगार त्यांच्या कुटुंबांपासून आणि नेहमीच्या वातावरणापासून दूर राहतात. गोदरेज सहयोग ही त्यांच्या मनस्थितीची एक पोचपावती आहे. तसेच अशी बांधकाम स्थळे निर्माण करण्याची एक वचनबद्धता आहे, जी केवळ कार्यक्षमच नाहीत, तर माणुसकी देखील जपतात.”

प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या या उपक्रमाच्या परिणामांवर प्रकाश टाकताना, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिव्यांग दोशी म्हणाले, “घरापासून लांब राहात असल्याने बांधकाम कामगार अनेकदा योग्य यंत्रणेअभावी वेगळा आधार शोधतात. मात्र, कालांतराने यामुळे तणाव वाढू शकतो. या प्रायोगिक उपक्रमा दरम्यान, संरचित गट सत्रे आणि गुप्त समुपदेशनामुळे त्यांना विश्वास वाटतो आणि संवाद सुधारतो. यामुळे कामगारांचा देखील विश्वास बसतो आणि एखाद्याला काही त्रास होत असेल तर त्याचे वेळेवर निदान होते. 1to1 Help सोबत भागीदारी केल्यामुळे आम्हाला थेट कामाच्या ठिकाणी व्यावसायिक, वैद्यकीयदृष्ट्या माहितीपूर्ण सहाय्य प्रदान करणे शक्य होते, जिथे या सुविधेची उपलब्धता सर्वात महत्त्वाची असते.”

भारतातील अनेक अभ्यासांनी हे अधोरेखित केले आहे की, स्थलांतरित बांधकाम कामगारांच्या मोठ्या संख्येला कुटुंबापासून लांब राहिल्याने आणि योग्य यंत्रणांच्या माध्यमातून दिलासा न मिळाल्याने मानसिक घुसमट सहन करावी लागते. ही एक अशी समस्या आहे, जिच्याकडे कायम दुर्लक्ष केले जाते.गोदरेज सहयोग हा कार्यस्थळावरील आरोग्याबाबत कंपनीच्या विचारातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो शारीरिक सुरक्षेवरील पारंपरिक दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन मानसिक आरोग्याविषयी जागरूकता, आणि व्यावसायिक मदतीची उपलब्धतेचा समावेश असलेल्या अधिक सर्वसमावेशक मॉडेलकडे वाटचाल करतो.

सगळे कामगार आणि गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी मेघा गोयल; गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडचे ​​मुख्य परिचालन अधिकारी संदीप नवलखे; गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे कॉर्पोरेट ऑडिट आणि ऍश्युरन्स विभागाचे व्ही. स्वामिनाथन; गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे कॉर्पोरेट सेवा विभागाचे ग्रुप हेड अजय भट्ट; गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिव्यांग दोशी आणि 1 टू 1 हेल्पचे मुख्य विकास अधिकारी कुणाल अशोक यांच्या उपस्थितीत गोदरेज सिटी पनवेल येथे सुरू करण्यात आलेला हा उपक्रम, सर्वसमावेशक, लोक-केंद्रित विकास आणि जबाबदार व्यावसायिक पद्धतींप्रति गोदरेज प्रॉपर्टीजच्या दीर्घकालीन वचनबद्धतेला अधोरेखित करतो

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य