डिक्कीच्या शिरपेचात अशोक खाडे यांच्या पद्मश्रीने आणखी एक मानाचा तुरा – पद्मश्री मिलिंद कांबळे

डिक्कीच्या शिरपेचात अशोक खाडे यांच्या पद्मश्रीने आणखी एक मानाचा तुरा – पद्मश्री मिलिंद कांबळे

अशोक खाडे यांच्या पद्मश्री सन्मानानिमित्त डिक्की परिवारात पाचव्या पद्मश्रीचा गौरव; पुण्यात डिक्कीतर्फे विशेष सत्कार समारंभ

पुणे, दि. ——
उद्योजक अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की)च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, असे गौरवोद्गार डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष व आयआयएम जम्मूचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी काढले.

पुण्यातील डिक्की मुख्यालयात पद्मश्री जाहीर झाल्यानिमित्त दलित उद्योजकांच्या वतीने अशोक खाडे यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

यावर्षी डिक्की परिवारातील उद्योजक अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण दलित उद्योजक समाजाला अभिमान वाटत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. याआधी पद्मश्री मिलिंद कांबळे, कल्पना सरोज, रवी नारा आणि राजेश सरय्या यांना हा सन्मान प्राप्त झाला असून, अशोक खाडे हे डिक्की परिवारातील पाचवे पद्मश्री पुरस्कारार्थी ठरले आहेत.

दलित उद्योजकांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना संधी व व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे कार्य डिक्की सातत्याने करीत असून पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या नेतृत्वामुळेच हे शक्य झाले असल्याची भावना अशोक खाडे यांनी यावेळी व्यक्त केली.

या सत्कार समारंभाला पद्मश्री मिलिंद कांबळे, डिक्की महाराष्ट्र राज्य प्रमुख मुकुंद कमलाकर, अविनाश जगताप, राष्ट्रीय महिला समन्वयक सीमा कांबळे, सचिन दिघोळकर, निवेदिता कांबळे ,गणेश शिंदे यांच्यासह डिक्कीचे राज्य व पुणे स्तरावरील पदाधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य