सेवा सहयोग द्वारा आयोजित नवीन शैक्षणिक धोरणातून स्वयंसेवी शिक्षण घडवणारी योजना - "सेवाफेस्ट २०२६"चे आयोजनयेत्या शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी सिंहगड रोड येथीलपु ल देशपांडे उद्यानशेजारी,कलाग्राम येथेसायंकाळी साडे चार ते आठ या वेळेत


सेवा सहयोग द्वारा आयोजित नवीन शैक्षणिक धोरणातून स्वयंसेवी शिक्षण घडवणारी योजना - "सेवाफेस्ट २०२६"चे आयोजन
येत्या शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी सिंहगड रोड येथील
पु ल देशपांडे उद्यानशेजारी,कलाग्राम येथे
सायंकाळी साडे चार ते आठ या वेळेत
पुणे
(प्रतिनिधी)
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रेडिट-आधारित उपक्रम व सामाजिक सहभाग यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे.याच पार्श्वभूमीवर विविध शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांसाठी ठराविक स्वयंसेवक तास (Volunteering Hours) पूर्ण करण्याच्या उद्देशाने सामाजिक उपक्रमांशी जोडल्या जात आहेत.

पुण्यातील एम.ई.एस वरिष्ठ महाविद्यालय,फर्ग्युसन महाविद्यालय यांसारख्या नामांकित शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी सेवा सहयोग फाउंडेशन सोबत शिक्षण,पर्यावरण व वस्ती विकासाशी संबंधित विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेत आहेत.या शैक्षणिक संस्थांनी सेवा सहयोग फाउंडेशनसोबत सामंजस्य करार (MoU) करून स्वयंसेवकत्वाची औपचारिक जबाबदारी स्वीकारली आहे.

सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून वस्तीमध्ये राहणाऱ्या हजारो गरीब व होतकरू मुलांसाठी " स्कूल किट वाटप",विद्यार्थी विकास व शिष्यवृत्ती योजना,सेवा भोजन,किशोरी विकास योजना,स्वच्छता व आरोग्य जनजागृती,व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे,अभ्यासिका तसेच दिव्यांग मुलांसाठी दोन विशेष केंद्रे चालवली जात आहेत.महिला सक्षमीकरण अंतर्गत स्वावलंबन व व्यवसाय मार्गदर्शन तसेच "समुत्कर्ष योजना " राबवून अनेक महिलांनी आपापले बचत गट स्थापन करून स्वतःचे छोटे व्यवसाय सुरू करत स्वावलंबन साधले आहे. 

सेवा सहयोग द्वारा “निर्मल वारी” हा उपक्रम पंढरपूर वारीतील गावांमध्ये अनेक वर्षांपासून यशस्वीपणे राबवला जात असून,या कार्याची दखल राज्य शासनानेही घेतली आहे. तसेच युवकांसाठी “युथ फॉर सेवा” उपक्रमातून तरुणांना समाजकार्याशी जोडले जात आहे.शालेय विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय लागावी यासाठी “मॅजिक गुल्लक (जादुई गुल्लक)” ही अभिनव योजना सुरू करण्यात आली असून,विविध शाळांमधून या उपक्रमाला उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.कोविड -१९ काळात सेवा सहयोगचे कार्य उल्लेखनीय ठरले असून,अनेक आय टी क्षेत्रातील व्यावसायिक व स्वयंसेवकांनी वैकुंठ स्मशानभूमी व इतर ठिकाणी स्वतःच्या खर्चाने, जिवाची पर्वा न करता,गरजू कुटुंबांना महत्त्वपूर्ण सेवा दिली आहे.

याच विषयावर आधारित, शनिवार,१४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार ते आठ या वेळेत पुण्यातील कलाग्राम,सिंहगड रोड येथे,संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष २०२६ (International Year of Volunteering) च्या निमित्ताने सेवाभाव, युवक सहभाग व सामाजिक बांधिलकी साजरी करण्यासाठी सेवाफेस्ट २०२६ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

"सेवा - फेस्ट"च्या माध्यमातून शैक्षणिक संस्था,विद्यार्थी, स्वयंसेवी संघटना व नागरिकांना एकत्र आणून स्वयंसेवेची संस्कृती अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.शैक्षणिक वर्षात सोशल क्रेडिट मिळविण्यास इच्छुक विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी,असे आवाहन "सेवा सहयोग" च्या वतीने करण्यात आले आहे.

👉 या प्रेरणादायी उपक्रमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी
📍 कलाग्राम,सिंहगड रोड,पुणे शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६ येथे सायंकाळी साडे चार ते आठ या वेळेमध्ये अवश्य भेट द्यावी.अधिक माहितीसाठी
९०४९८४५९९९ या भ्रमणध्वनी वर संपर्क करावा असे आवाहन सेवा सहयोग फाउंडेशनचे कार्यकारी संचालक शैलेश घाटपांडे यांनी केले आहे.
सोबत फोटो 
*फोटोओळ :*
MES वरिष्ठ महाविद्यालयाकडून प्राचार्य डॉ रवींद्र वैद्य,उपप्राचार्य डॉ.पूनम रावत, बीबीए ,सी ए विभागप्रमुख नेहा कुलकर्णी सेवा सहयोग फाउंडेशनचे ऑपरेशनल डायरेक्टर शैलेश घाटपांडे.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य