कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेचा तिळगुळ समारंभ उत्साहातवयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा केला सन्मान

कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेचा तिळगुळ समारंभ उत्साहात

वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा केला सन्मान

पुणे : कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे तिळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा या वेळी यथोचित सन्मान करण्यात आला.

पौड रोड येथील पुण्याई सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलन आणि झाशीच्या राणीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या अध्यक्ष मुक्ता चांदोरकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेले ज्येष्ठ सभासद मोहन टेंबे, अविनाश हळबे, विकास कागलकर, श्रीनिवास सप्रे, दिलीप सप्रे, दिगंबर सप्रे, श्रीधर पंतवैद्य, अरविंद जायदे, अनुराधा पंडित, क्षिप्रा शहाणे, नारायण शेवडे, जयंत श्रीखंडे, विनायक पित्रे, शरद तांबे, श्रीकांत हर्डीकर, रमेश कीर्तने, निलिमा हर्डीकर, दीपक भडकमकर यांचा औक्षण करून सन्मान करण्यात आला.

ज्येष्ठ व्यक्तींचा आपुलकीने आणि आदराने सन्मान करत आहेत ही आनंदाची, समाधानाची बाब आहे, अशी भावना क्षिप्रा शहाणे यांनी व्यक्त केली. आताच्या काळात केक न कापता, पारंपरिक पद्धतीने औक्षण करून सन्मान केल्याने परंपरा जपल्याचा आनंद वाटला अशा भावना शरद तांबे यांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  ज्येष्ठ अकॉर्डियन वादक अनिल गोडे आणि सेक्सोफोन वादक महेंद्रकुमार यांनी सदाबहार गीते सादर केली. त्यांना रोहित जाधव (ऑक्टोपॅड, ढोलक) आणि सुभाष देशपांडे (सिंथेसायझर) यांनी साथ केली. ‘बाहो में चले आओ’, ‘ओ चष्मेबद्दूर’, ‘बाबूजी धीरे चलना’, ‘गाता रहे मेरा दिल’, ‘पेहला नशा’, ‘आने वाला कल’, ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे’, ‘लग जा गलें’, ‘रुप तेरा मस्ताना’, ‘बदन पे सितारे’, ‘आजा सनम मधुर चांदनी में’ यांसारखी सदाबहार लोकप्रिय गीते सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या विश्वस्त राजश्री महाजनी यांनी केले तर आभार अध्यक्ष मुक्ता चांदोरकर यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य