पुण्यात नॅशनल टी20 क्रिकेट फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड स्पर्धेचे आयोजन· द पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन व ब्लाईंड क्रिकेट असोसिएशन (बीसीए) यांच्या संयुक्त विद्यमाने व एचसीएल फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजन



 

पुण्यात नॅशनल टी20 क्रिकेट फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड स्पर्धेचे आयोजन

· द पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन व ब्लाईंड क्रिकेट असोसिएशन (बीसीए) यांच्या संयुक्त विद्यमाने व एचसीएल फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजन
 
पुणे,13 फेब्रुवारी 2026 : पुण्यात 15 ते 19 फेब्रुवारी 2026 दरम्यान नॅशनल टी20 क्रिकेट फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेला एचसीएल फाऊंडेशनचे सहकार्य लाभले असून,द पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन (पीबीएमए) आणि ब्लाईंड क्रिकेट असोसिएशन (बीसीए) यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

या स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन डेक्कन जिमखाना मैदान आणि पद्ममावती येथील टेंबेकर मैदान येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र,राजस्थान,मध्य प्रदेश,गुजरात,कर्नाटक,उत्तर प्रदेश,पश्चिम बंगाल आणि पंजाब या आठ राज्यांच्या संघांचा या स्पर्धेत सहभाग असून पाच दिवसात एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत.
 
ब्लाईंड क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष रवी वाघ म्हणाले की,या स्पर्धेचे उद्घाटन 15 फेब्रुवारी रोजी होणार असून त्यानंतर, दृष्टीदोष असलेल्या शालेय विद्यार्थिनींचा विशेष प्रदर्शनीय सामना खेळवण्यात येणार आहे. लीग सामने 16 ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणार असून अंतिम सामना आणि पारितोषिक वितरण समारंभ 19 फेब्रुवारी रोजी डेक्कन जिमखाना मैदानावर पार पडणार आहे.
 
पीबीएमएचे अध्यक्ष राजेश शहा म्हणाले की,गेल्या अनेक वर्षापासून पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनच्या सहकार्याने ब्लाईंड क्रिकेट असोसिएशन ने सर्वसमावेशक खेळाला सातत्याने प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे आणि यामुळे दृष्टीदोष व दृष्टीहीन खेळाडूंना संपूर्ण भारतात स्पर्धात्मक सहभागासाठी संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
 
एचसीएल फाऊंडेशनच्या संचालिका डॉ.निधी पुंधीर म्हणाल्या की, गेल्या 10 वर्षात स्पोर्टस्‌‍ फॉर चेंज (एसएफसी) ने संपूर्ण भारतात समावेशक क्रीडा उपक्रमांना सक्षम केले आहे.यामध्ये तळागाळातील पातळीवर दर्जेदार प्रशिक्षण व विकास यावर लक्ष्य केंद्रित केले गेले आहे. या टी20 स्पर्धेमुळे खेळाडूंमधील कार्यक्षमता व उत्कृष्टता लोकांसमोर येण्याच्या दृष्टीने खेळात असलेल्या सामर्थ्यामधील आमचा विश्वास आणखी दृढ झाला आहे.
 
2011 मध्ये सुरू झालेल्या टी-20 ब्लाईंड क्रिकेट स्पर्धेने पुण्यातील राज्यस्तरीय स्पर्धेतून विकसित होऊन राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त केली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना निवास व्यवस्था,भोजन,प्रवास सहाय्य,वैद्यकीय सुविधा,क्रीडा साहित्य तसेच स्थानिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
 
खेळाचे नियम
ब्लाईंड क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूमध्ये धातूचे छोटे बेअरींग असलेला,आवाज करणारा प्लॅस्टिकचा चेंडू वापरला जातो. खेळाडूंना बी1 (पुर्णत: अंध),बी2 (अंशत: अंध) आणि बी3 (अल्पदृष्टी) या दृष्टीक्षमतानुसार गटांमध्ये विभागले जाते.संघात या तिन्ही गटांतील खेळाडूंचा समावेश असणे आवश्यक असते.चेंडू जमिनीवरून अंडरआर्म फेकला जातो.




Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य