गोल्फ खेळ देशातील सर्व घटकापर्यंत पोहचला पाहिजे* - *अनिरुद्ध सेवलेकर*— पुण्यात गोल्फच्या राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगचे उत्साहात उद्घाटन —


— पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट मध्ये देशभरातील नामांकित संघ व खेळाडू यांच्यात होणार रोमांचक लढती— 
पुणे दि —-गोल्फ खेळ हा अतिशय दर्जेदार आहे .तो देशातील सर्व घटकापर्यंत पोहचला पाहिजेत असे मत गोल्फ इंडस्ट्री असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ऑक्सफर्ड ग्रुप चे संस्थापक अनिरुद्ध सेवलेकर यांनी व्यक्त केले .पुण्यात होणाऱ्या गोल्फच्या राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते .गोल्फ खेळाची देशातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि नावाजलेली अशी स्पर्धा समजली जाते .ही स्पर्धा 6 ते 13 एप्रिल दरम्यान पुण्यात पार पडणार आहे तर एकूण 16 संघ आणि 180 ते 250 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत .या स्पर्धेचा पारितोषिक वितरन समारंभ 13 एप्रिल 2025 रोजी पुण्यातिल प्रसिद्ध अशा ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट आणि क्लब येथे पार पडणार आहे .
     पुढे ते म्हणाले की ,अतिशय नावाजलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रिमीअर लीगला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे .आज देशभरातील विविध संघ सहभागी झाले आहेत .त्यामुळे ऑक्सफोर्ड गोल्फ लीग मध्ये पुणेकराना अतिशय चुरशीचे गोल्फ सामने बघायला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .आणि उपस्थित सर्व सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या .राष्ट्रीय लीग च्या सामन्यासाठी नोंदणीला अनेक गोल्फ खेळाडू आणि संघानी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे .
              या प्रिमियर लीगचे उद्घाटन गोल्फ इंडस्ट्री आसोसिएशन चे अध्यक्ष व ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सचे संस्थापक अनिरुद्ध सेवलेकर यांच्या हस्ते पार पडले .
    या वेळी गोल्फ इंडस्ट्री असोसिएशन चे अध्यक्ष व ऑक्सफर्ड ग्रुप चे अनिरुद्ध सेवलेकर,ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट चे रोहन सेवलेकर,एस गोल्फिंग चे आदित्य मालपणी ,ऑक्सफर्ड रिसॉर्ट चे व्यवस्थापक कौशिल वोरा व सर्व संघाचे खेळाडू उपस्थित होते .
            या लीगमध्ये तब्बल बारापेक्षा जास्त संघ सहभागी झाले आहेत .आजपर्यत्न ईगल फोर्सेस ,बिनधास्त बॉईज ,सुलतान स्विंग्स ,ब्लिस्ट्रिंग बर्ड्स ,झिंगर्स,ग्रीन गॅडीटर्स,सुझलोन ग्रीन्स,रोरिंग टायगर्स,
पुना लायन्स,सुब्बन सनरायजर्स ,द लीगशी क्लब ,बर्डी स्कॉड यासारखे मातब्बर संघ सहभागी झाले आहेत .त्यामुळे यावर्षीच्या ऑक्सफर्ड गोल्फ लीग च्या स्पर्धा अतिशय चुरशीच्या आणि रंगतदार होणार असल्याचे आयोजक रोहन सेवलेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली .पुढील सात दिवस या स्पर्धा सुरू राहणार आहेत .त्यामुळे या स्पर्धेचा आनंद सर्वांनी घेण्याचे आवाहन आयोजक रोहन सेवलेकर यांनी केले .

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील सेवानिवृत्त पोलिसांना न्यायालयाचा दिलासा**एस-१४ वेतनश्रेणीबाबत ऐतिहासिक निर्णय ; सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्था (महाराष्ट्र राज्य)

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा