पहिल्या पुणे पिकल बॉल लीग स्पर्धेत टस्कर टायटन्स संघाला विजेतेपद

पुणे, 3 एप्रिल 2025: पिकल हाऊस एक्स एसबीए यांच्या वतीने आयोजित पहिल्या पुणे पिकल बॉल लीग स्पर्धेत अंतिम फेरीत टस्कर टायटन्स संघाने रेजिंग रायनोज संघाचा 3-2 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

कोरेगाव पार्क येथील एनफिल्ड अरेना कोर्टवर सुरू असलेल्या कुमार बिल्डर्स यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभलेल्या या स्पर्धेत चुरशीच्या अंतिम लढतीत टस्कर टायटन्सच्या हणमंत धोत्रे व निपुण खुराणा यांनी रायनोजच्या कुलदीप रुचंदानी व ईशांत रेगे यांचा 15-08 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. तर, रायनोजच्या मोक्ष जैन व संकेत राज यांनी टायटन्सच्या सागर दिवाण व आशना पेडणेकर यांचा 15-06 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. टायटन्सच्या सागर दिवाणने ध्रुव दयालच्या साथीत रमा कुलकर्णी व संदेश मनवार यांचा 15-07 असा पराभव करून संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर रायनोजच्या प्रियल चॅटर्जी व संदेश मनवार यांनी हरजस बाजवा व प्रियांका सूर्तानी यांचा 15-12 असा पराभव करून संघाला 2-2 अशी बरोबरी निर्माण करून दिली. त्यामुळे सामना टाय ब्रेकरमध्ये खेळविण्यात आला. टायब्रेकरमध्ये टायटन्सच्या हणमंत धोत्रे व निपुण खुराणा या जोडीने इशांत रेगे व संकेत राज यांचा 15-13 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संचालक सुधांशू मेडसीकर, भाव्या मेहता व यश मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले.

निकाल: अंतिम फेरी:
टस्कर टायटन्स वि.वि.रेजिंग रायनोज 3-2(हणमंत धोत्रे/निपुण खुराणा वि.वि.कुलदीप रुचंदानी/ईशांत रेगे 15-08; सागर दिवाण/आशना पेडणेकर पराभुत वि.मोक्ष जैन/संकेत राज 06-15; सागर दिवाण /ध्रुव दयाल वि.वि.रमा कुलकर्णी/संदेश मनवार 15-07; हरजस बाजवा/प्रियांका सूर्तानी पराभुत वि.प्रियल चॅटर्जी/संदेश मनवार 12-15; टायब्रेकर: हणमंत धोत्रे/निपुण खुराणा वि.वि.इशांत रेगे/संकेत राज 15-13)

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील सेवानिवृत्त पोलिसांना न्यायालयाचा दिलासा**एस-१४ वेतनश्रेणीबाबत ऐतिहासिक निर्णय ; सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्था (महाराष्ट्र राज्य)

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा