संभाजी ब्रिगेड'च्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनचा मोर्चामहाराजांचा एकेरी उल्लेख खपवून घेणार नाही; त्वरित नावात बदल करावा; दीपक काटे यांची मागणी

पुणे: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जाणून बुजून एकेरी उल्लेख करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांचा जाहीर निषेध करत शिवधर्म फाउंडेशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराज असे पूर्ण लिहावे किंवा संघटनेचे नाव बदलावे, अशी मागणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी केली.

पुणे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शेकडोंच्या संख्येने शिवभक्त व शंभू भक्त या मोर्चामध्ये सहभागी झाले. 'जय भवानी जय शिवाजी', 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज' की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. फाउंडेशनचे राज्य उपाध्यक्ष किरण साळुंखे, पुणे जिल्हा अध्यक्ष करण ढाणे-पाटील, बारामती तालुका अध्यक्ष अक्षय चव्हाण, राहुल मदने, सुग्रीव निंबाळकर, विशाल धुमाळ, रोहित तुपे, सागर पाटील, कृष्णा क्षीरसागर, स्वप्निल निंबाळकर, रुपेश शिंदे, मयूर काळे, सागर जोशी, भुवनेश्वर शिरगिरे, संजय मदने, दत्ता मदने, अभिमन्यू कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

दीपक काटे म्हणाले, "संभाजी ब्रिगेड नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत आहे, ही बाब संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांना वारंवार निदर्शनास आणून दिली आहे. तरीही संभाजी ब्रिगेड संघटना व पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्याला फाशी देण्याची भाषा करतात. मात्र स्वतःच्या संघटनेत संभाजी महाराजांचा अवमान होतोय, एकेरी उल्लेख होतोय, याकडे ते दुर्लक्ष करतात. हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. संभाजी ब्रिगेड संघटनेने व पक्षाने नावात बदल केला नाही, तर संघटना आणि पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत."

"संभाजी ब्रिगेडने नावात 'छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड' असे पूर्ण नाव लिहावे किंवा नाव बदलावे. नाव बदलण्यास नकार दिला, तर संघटना व पक्षाचे नाव आणि मान्यता रद्द करावी आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान कायम राखण्यासाठी राज्य शासनाने कठोर पावले उचलून, महाराजांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करावी, या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांकडे दिले असून, मुख्यमंत्र्यांनी याबाबत योग्य निर्णय घेण्याची विनंती केली आहे," असे दीपक काटे यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील सेवानिवृत्त पोलिसांना न्यायालयाचा दिलासा**एस-१४ वेतनश्रेणीबाबत ऐतिहासिक निर्णय ; सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्था (महाराष्ट्र राज्य)

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा