तळहातावर निखारा ठेवून सामाजिक कार्यकर्त्यांचे कामज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य : पुणे सार्वजनिक सभेचा १५५ वा वर्धापन दिन कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळा
पुणे : सार्वजनिक काकांनी ज्या विचारांनी सभेची सुरुवात केली, तो विचार अजूनही संपलेला नाही. सार्वजनिक सभेसमोर आजही अनेक प्रश्न आहेत, ज्यासाठी त्यांना काम करायचे आहे. तळहातावर निखारा ठेवून प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन कार्यकर्ते काम करतात. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. मूल्यात्मक भावनेने दुसऱ्याकडे पाहावे, हेच प्रत्येक धर्म शिकवतो. परंतु तो कोणाच्या हातात जातो, हे महत्त्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य यांनी व्यक्त केले.
पुणे सार्वजनिक सभेचा १५५ वा वर्धापन दिन कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बुधवार पेठेतील संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष विद्याधर नारगोलकर, कार्याध्यक्ष अनिल शिदोरे यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमात सद्गुरु स्वाती वसंत खाडे सनातन संस्था यांना वंदनीय रमाबाई रानडे पुरस्कार तर मुक्तांगण इंग्लिश स्कूलच्या प्राजक्ता मुरमट्टी यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना देखील यावेळी गौरविण्यात आले.
डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, आज टीव्ही लावला तर बातम्या बघायची भीती वाटते; अनेक प्रश्न समोर दिसतात. स्त्रियांचे, भाषांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न का आहेत आणि ही परिस्थिती आपण का म्हणून सहन करायची. विद्यार्थ्यांमध्ये विचारांची खूप ताकद आहे. तरुणांना जे सतत बोलत असतात, त्यांना साहित्यातून उत्तर तरुणांनी दिले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विद्याधर नारगोलकर यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल शिदोरे यांनी प्रास्ताविक केले. शरद गर्भे यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले
Comments
Post a Comment