प्रथमेश ढवळे व संजय चेटूले यांना वरिष्ठ राष्ट्रीय टेनीकवाईट स्पर्धेत रोप्य पदक
प्रथमेश ढवळे व संजय चेटूले यांना वरिष्ठ राष्ट्रीय टेनीकवाईट स्पर्धेत रोप्य पदक
दि.२५ ते २९ मार्च दरम्यान भुवनेश्वर, ओडीसा येथे संपन्न झालेल्या ४८ व्या वरिष्ठ गट स्पर्धा २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र टेनीकवाईट (रिंगटेनिस) संघातील पुरुष दुहेरी स्पर्धेतील प्रथमेश ढवळे व संजय चेटूले यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला .त्या अगोदर त्यांनी उपांत्य फेरी मधे आंध्रप्रदेश संघातील दुहेरी स्पर्धकांना २०- २२ २२- २१ २१-११ असे हरवत अंतीम फेरीत धडक मारली. अंतीम फेरीतील सामन्यामध्ये तामिळनाडू संघातील दुहेरी स्पर्धकांशी मात्र २१-१७ ,२१- १९ असा
पराभव स्वीकारत रौप्यपदक पटकावले.
राष्ट्रिय स्पर्धे मध्ये रौप्य पदक मिळविल्याबद्दल महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष .श्री.मोहनदादा जोशी,कार्याध्यक्ष डॉ. विजय दर्डा,सचिव श्री अनिल वरपे
कोषाध्यक्ष अॅड मृणाल बांडेबुचे तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
Comments
Post a Comment