भोरमधील ग्रामस्थांसाठी पुणेकरांतर्फे वैद्यकीय शिबिराचे आयोजनफाउंडेशन फॉर एन्शियंट इंडियन फिलॉसॉफी अँड मेडिसिन आणि ॲव्हेट लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर
पुणे: फाउंडेशन फॉर एन्शियंट इंडियन फिलॉसॉफी अँड मेडिसिन आणि ॲव्हेट लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने भोर मधील माळेगाव, नसरापूर परिसर येथे तीन दिवसीय मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात ४२५ ग्रामस्थांनी सहभाग घेतला. यावेळी आवश्यक रुग्णांना उपचार देखील देण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन स्मिता देशपांडे, सीए. विष्णू बांगड, ॲड. संदीपक फडके, पुणे शहर भाजप उपाध्यक्ष सुनील पांडे, संस्थेचे संस्थापक डाॅ. सचिन देशपांडे यांच्या उपस्थितीत झाले. डोळे तपासणी, चष्मे वाटप, गाठींचे आजार, मूत्र विकार, हर्निया, बीपी, पोटविकार, मधुमेह, ईसीजी यांसह विविध तपासण्या शिबिरात करण्यात आल्या.
डाॅ. सचिन देशपांडे म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय शिबिरे अत्यंत महत्त्वाची आहेत. अनेक रुग्ण आर्थिक अडचणींमुळे वेळेवर डॉक्टरांकडे जात नाहीत, त्यामुळे त्यांचे आजार बळावतात. अशा शिबिरांच्या माध्यमातून रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यकतेनुसार औषधे मिळतात. भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन करून अधिकाधिक लोकांना आरोग्य सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. सुनिल पांडे यांनी शिबिरार्थीना मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment