कोद्रे फार्म्स करंडक’ खुल्या गटातील मुलांची आंतरक्लब क्रिकेट स्पर्धा !!क्रिकस्टार रायझिंग क्रिकेट क्लब, व्हि-एड्ज क्रिकेट क्लब यांच्यात विजेतेपदासाठी लढत !!

पुणे, २ एप्रिलः ट्वेन्टीफोर स्पोटर्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित ‘कोद्रे फार्म्स करंडक’ खुल्या गटातील मुलांच्या २५-२५ षटकांच्या आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत क्रिकस्टार रायझिंग क्रिकेट क्लब आणि व्हि-एड्ज क्रिकेट क्लब या दोन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे.
 
सिंहगड रोड येथील कोद्रे फार्म्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत वैभव बेनबेरू याने केलेल्या ११० धावांच्या जोरावर क्रिकस्टार रायझिंग क्लबने रियुनायटेड क्रिकेट क्लबचा ३ गडी राखून पराभव केला. धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यामध्ये रियुनायटेड क्रिकेट क्लबने पहिल्यांदा फलंदाजी करताना २३१ धावांचे लक्ष्य उभे केले. रोहन देशमुख (६२ धावा), विशाल गुप्ता (४९ धावा) आणि समीर पंचपोर (३७ धावा) यांनी संघाचा डाव उभा केला. हे लक्ष्य क्रिकस्टार रायझिंग क्लबने १९.२ षटकात व ७ गडी गमावून पूर्ण केले. वैभव बेनबेरू याने ४६ चेंडूत ६ चौकार आणि १२ षटकारांच्या मदतीने ११० धावा करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला.

राहूल सोनावणे याची अचूक गोलंदाजी आणि फलंदाजांची साथ यामुळे व्हि-एड्ज क्रिकेट क्लबने छत्रपती क्रिकेट क्लबचा १ गडी आणि दोन चेंडू राखून निसटता पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना छत्रपती क्रिकेट क्लबने २६३ धावांचे आव्हान उभे केले. इंद्रजीत भालेकर याने १०४ धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. व्हि-एड्जच्या राहूल सोनावणे याने ४८ धावांमध्ये ४ गडी टिपले. हे आव्हान व्हि-एड्ज क्रिकेट क्लबने अखेरच्या षटकामध्ये पूर्ण केले. ऋतुराज धुलगुडे याने ८५ धावांची तर, मनाजि गुरूंग याने ५७ धावांची खेळी केली. विराज दारवटकर याने ४४ धावांची खेळी करून संघाचा विजय साकार केला.

सामन्याचा सविस्तर निकालः उपांत्य फेरीः
रियुनायटेड क्रिकेट क्लबः २३ षटकात १० गडी बाद २३१ धावा (रोहन देशमुख ६२ (३२, ११ चौकार, २ षटकार), विशाल गुप्ता ४९, समीर पंचपोर ३७, वैभव बेनबेरू ३-३७, एस. चव्हाण २-३६) पराभूत वि. क्रिकस्टार रायझिंग क्लबः १९.२ षटकात ७ गडी बाद २३२ धावा (वैभव बेनबेरू ११० (४६, ६ चौकार, १२ षटकार), वैभम मोरे १९, सुयश भट ३-४७, विशाल गुप्ता २-४१); सामनावीरः वैभव बेनबेरू;

छत्रपती क्रिकेट क्लबः २२.४ षटकात १० गडी बाद २६३ धावा (इंद्रजीत भालेकर १०४ (४५, ३ चौकार, १२ षटकार), ध्रुव मलिक २६, राहूल सोनावणे ४-४८, सिद्धार्थ वाळके ३-५२) पराभूत वि. व्हि-एड्ज क्रिकेट क्लबः २४.४ षटकात ९ गडी बाद २६४ धावा (ऋतुराज धुलगुडे ८५ (३६, ६ चौकार, ८ षटकार), मनाजि गुरूंग ५७ (२७, ७ चौकार, ४ षटकार), विराज दारवटकर ४४, अमित मगदुम ४-४४, इंद्रजीत भालेकर ३-४५); सामनावीरः राहूल सोनावणे.

------

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील सेवानिवृत्त पोलिसांना न्यायालयाचा दिलासा**एस-१४ वेतनश्रेणीबाबत ऐतिहासिक निर्णय ; सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्था (महाराष्ट्र राज्य)

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा