काँग्रेस भवन येथे 'दस्तकारी हाट' वस्त्र प्रदर्शनास प्रारंभ----------हस्तकला आणि विणकामगारांचे अनोखे प्रदर्शन
पुणे:
देशभरातून आलेल्या १२ राज्यातील कुशल कारागिरांनी तयार केलेल्या हस्तनिर्मित वस्त्र, साड्या, शाली आणि गालिच्यांची विस्तृत श्रेणी असलेल्या 'दस्तकारी हाट' या अनोख्या वस्त्र प्रदर्शनास ५ एप्रिल रोजी प्रारंभ झाला.
दि.५ ते २१ एप्रिल २०२५ दरम्यान काँग्रेस भवन प्रांगण (शिवाजीनगर,पुणे) येथे दररोज सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनातील दालनांमध्ये बनारसी सिल्क, लिनन, कॉटन आणि पारंपरिक वस्त्र प्रावरणे प्रदर्शित करण्यात आली आहेत.ही वस्त्रे विशेषतः उन्हाळा,सण आणि लग्न कार्यांसाठी डिझाइन केली आहेत. यामध्ये साड्या, ड्रेस, सूट, कुर्ते, शाली आणि हस्तनिर्मित कपडे उपलब्ध आहेत.
बनारसी सिल्क साड्या, कुर्ते, बेडशीट आणि गालिचे हे मुख्य आकर्षण आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहकांना एका छताखाली विविध प्रकारच्या वस्त्र आणि कपड्यांची खरेदी करण्याची संधी मिळत आहे. ५० हून अधिक स्टॉल्समध्ये भारताच्या विविध राज्यांतील सिल्क, कॉटन आणि इतर पारंपरिक वस्त्रांचे प्रदर्शन आहे.प्रवेश आणि पार्किंग मोफत आहे.
.............................................
Comments
Post a Comment