स्विच’ बाइक्सचा पुण्यात विस्तार डीएके ऑटोमोटिव्हज’सोबत भागीदारी ‘सीएसआर ७६२’च्या सादरीकरणासह ‘स्विच मोटोकॉर्प’करणार विस्तार
पुणे,०६ एप्रिल २०२५ : बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईत यशस्वी सादरीकरण केल्यानंतर आता ‘स्विच मोटोकॉर्प’ला (Svitch) पुण्याची बाजारपेठ खुणावत असून, ‘सीएसआर ७६२’ या प्रीमियम दुचाकी इलेक्ट्रिक बाइकसह कंपनी ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी कंपनीने ‘डीएके ऑटोमोटिव्हज’समवेत भागीदारी केली आहे. ‘स्विच’च्या बाइकमध्ये ग्राहकांना कामगिरी, स्टाइल आणि शाश्वततेचा अनुभव मिळेल, अशी कंपनीला खात्री आहे.
तंत्रस्नेही आणि पर्यावरणविषयक जागरूकतेसाठी ओळखले जाणारे पुणे ‘स्विच’च्या वाटचालीमध्ये मैलाच दगड ठरण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक बाइक्सची वेगाने वाढणारी मागणी पाहता ‘स्विच मोटोकॉर्प’ ‘सीएसआर ७६२’ ही प्रीमियम इलेक्ट्रिक बाइक सादर करीत आहे.
‘पुण्यातील आमचे हे पाऊल केवळ व्यावसायिक उपक्रम नसून, इलेक्ट्रिक वाहनांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे,’ असे ‘स्विच मोटोकॉर्प’चे संस्थापक राजकुमार पटेल यांनी सांगितले. आम्ही आमच्या बाइकच्या माध्यमातून पुणेकर ग्राहकांचा रायडिंगचा अनुभव आणखी वृद्धिंगत करण्यासाठी आणि शहरात वेगाने विस्तारणाऱ्या ‘ईव्ही इकोसिस्टीम’चा भाग होण्यासाठी इच्छुक आहोत, असेही पटेल यांनी नमूद केले.
‘चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत देशातील प्रथम (टिअर वन) आणि द्वितिय (टिअर टू) श्रेणीच्या शहरांमध्ये विस्तार करण्याचा ‘स्विच मोटोकॉर्प’चा विचार असून, या शहरांमध्ये १५ नवीन शोरूमची उभारणी करण्यात येणार आहे. याशिवाय बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई आणि पुणे या शहरांमध्ये नवीन टचपॉइंट तयार करून १०० किलोमीटरच्या परिसरात सर्व्हिस नेटवर्कचे जाळे उभारण्याचाही आमचा प्रयत्न आहे,’ असेही राजकुमार पटेल यांनी नमूद केले.
‘सीएसआर ७६२’विषयी
१) ‘स्विच मोटोकॉर्प’च्या ‘सीएसआर ७६२’ला डिझाइनसाठी यापूर्वीच ग्राहकांची मोठी पसंती मिळाली आहे.
२) देशात प्रथमच स्वॅप करता येणाऱ्या बॅटरी आणि ४० लिटरची बूट स्पेस ‘सीएसआर ७६२’ने देऊ केली आहे.
३) ही ई-बाइक स्टाइल आणि कार्यक्षमतेचा विलक्षण संगम आहे.
४) चार वर्षांच्या अथक परिश्रमातून या बाइकची निर्मिती करण्यात आली आहे.
५) मूळ डिझाइनमध्ये पन्नासपेक्षा अधिक सुधारणा, ३० हजार तासांहून अधिक चाचण्यांमध्ये तावून सुलाखून ‘स्विच मोटोकॉर्प’च्या समर्पित ‘इन-हाउस टीम’ने ‘सीएसआर ७६२’ची निर्मिती केली आहे.
--
Comments
Post a Comment