पीडीएफए लीग’ फुटबॉल स्पर्धा !!दुर्गा स्पोटर्स अॅकॅडमी, युकेएम कोथरूड एफसी, स्पोटर्स मेनिया संघांची विजयी कामगिरी !!
पुणे, २ एप्रिलः पुणे जिल्हा फुटबॉल संघटने तर्फे आयोजित ‘पीडीएफए लीग २०२५’ फुटबॉल स्पर्धेच्या व्दितीय श्रेणी गटाच्या सामन्यात दुर्गा स्पोटर्स अॅकॅडमी, उत्कर्ष क्रीडा मंच (युकेएम) कोथरूड एफसी आणि स्पोटर्स मेनिया या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.
कात्रज येथील भारती विद्यापीठ मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या व्दितीय श्रेणी गटाच्या झालेल्या सामन्यामध्ये उत्कर्ष क्रीडा मंच कोथरूड एफसी ब संघाने ईगल एफसीचा ३-२ असा पराभव केला. युकेएम संघाकडून हरीकृष्णा अदिगंटला, गौरव गोगई आणि देवांश मिश्रा यांनी गोल केले. ईगल एफसीकडून देबू चकमा व तुषार बोवी यांनी गोल नोंदविले. राजवर्धन पाटील याने केलेल्या गोलाच्या जोरावर स्पोटर्स मेनिया संघाने भारती एफसी संघाचा १-० असा पराभव केला. उत्तरार्धात बदली खेळाडू म्हणून आलेल्या राजवर्धनने गोल साधून संघाला विजय मिळवून दिला.
दुर्गा स्पोटर्स अॅकॅडमीने डायनामाईट्स एससी संघाचा ३-० असा सहज पराभव केला. दुर्गा संघाकडून मयुर वाघिरे, एल्विन फ्रान्सिस आणि तुषार दुर्गा यांनी गोलपूर्ण कामगिरी केली. सांगवी फुटबॉल क्लब असोसिएशन आणि साई फुटबॉल अॅकॅडमी यांच्यामधील सामना गोलशुन्य बरोबरीमध्ये सुटला.
सामन्यांचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः व्दितीय श्रेणी गटः
१) युकेएम कोथरूड एफसी बः ३ (हरीकृष्णा अदिगंटला ५२ मि., गौरव गोगई ६० मि., देवांश मिश्रा ६३ मि.) वि.वि. ईगल एफसीः २ (देबू चकमा २१ मि., तुषार बोवी ५३ मि.); पुर्वार्धः ०-१;
२) स्पोटर्स मेनियाः १ (राजवर्धन पाटील ८५ मि.) वि.वि. भारती एफसीः ०; पुर्वार्धः ०-०;
३) दुर्गा स्पोटर्स अॅकॅडमीः ३ (मयुर वाघिरे ३ मि., एल्विन फ्रान्सिस १८ मि., तुषार दुर्गा ४७ मि.) वि.वि. डायनामाईट्स एससीः ०; पुर्वार्धः २-०;
४) सांगवी फुटबॉल क्लब असोसिएशनः ० बरोबरी वि. साई फुटबॉल अॅकॅडमीः ०;
Comments
Post a Comment