डॉ. विकास आबनावे यांच्या 67व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन
पुणे : सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात सतत कार्यरत राहिलेले कै. डॉ. विकास आबनावे यांच्या 67व्या जयंतीनिमित्त डॉ. विकास आबनावे फौउंडेशन, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ व रक्ताचे नाते ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला समाजाच्या विविध स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात 67 बाटल्या रक्त संकलित करण्यात आल्या. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, तेच खरी मानवतेची सेवा आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
या शिबिराला शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट दिली. यामध्ये खालील मान्यवरांचा समावेश होता:
माजी आमदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार ,महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव प्रसाद आबनावे,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व संस्थेचे मानद अध्यक्ष मोहनदादा जोशी , माजी नगरसेवक डॉ स्नेहल पाडळे, अयुब पठाण, माजी नगरसेवकअविनाश बागवे ,माजी पीएमटी चेअरमन शेखर कपोते
युवक काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष सौरभ अमराळे ,काँग्रेस सोशल मीडियाचे सरचिटणीस सुरेश कांबळे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, लोकमतचे राजू इनामदार, प्रभातचे मनीष गुरम ,शिक्षणतज्ज्ञ कचरे सर, संस्थेचे संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,प्रशांत सुरसे, शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्ते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण उपस्थिती होती
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संस्थेचे खजिनदार प्रथमेश आबनावे, संस्थेचे सहसचिव पुष्कर आबनावे, संचालक सदस्य प्रज्योत आबनावे, गौरव आबनावे आणि संचालक दिलीप आबनावे यांची विशेष उपस्थिती होती. याशिवाय, संस्थेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदानाचे महत्त्व आणि आयोजकांचे मार्गदर्शन
शिबिरादरम्यान, प्रसाद आबनावे यांनी महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ व डॉ. विकास आबनावे फाउंडेशनच्या कार्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच, मोहनदादा जोशी यांनी कै. डॉ. विकास आबनावे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. डॉ.स्नेहल पाडळे यांनी आपल्या भाषणात रक्तगट तपासणी आणि आरोग्य शिबिराच्या विक्रमाची माहिती दिली.
रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदतीचा हात मिळणार आहे. रक्तदान ही समाजसेवेची सर्वोत्तम संधी असून, प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले.
Comments
Post a Comment