तिसऱ्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2025 स्पर्धेत आठ संघ सहभागी स्पर्धेस आज(3 एप्रिल)पासून प्रारंभ
पुणे, 2एप्रिल 2025 : पूना क्लब यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2025 स्पर्धेत आठ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा पूना क्लब स्विमिंग पूल या ठिकाणी 3 ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत रंगणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पूना क्लबचे अध्यक्ष गौरव गढोक यांनी सांगितले की, पूना क्लबचे सदस्य असलेल्या विविध संघमालकांनी लिलाव प्रक्रियेतून निवड केलेल्या खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे. याप्रसंगी व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव कर्नल सरकार, पीसीएसएल 2025 समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी वेंकीज, व्हेनकॉब व एनईसीसी हे मुख्य प्रायोजक आहेत. सुरुधा संघवी (48वर्षे),सोफिया बाकर (11 वर्षे), तिशा राठी(13वर्षे), अनैशा सूद (15वर्षे), समायरा मास्टर (10वर्षे), आरव नंदा (10 वर्षे), राजीव पाटील(16वर्षे), आदित्य महाराजसिंग (52वर्षे) हे लिलावातील रिटेन खेळाडू ठरले. तर,
अम्माया शेट्टी (11 वर्ष), अन्निका शेट्टी (14 वर्ष), मिहिका मोहिते (14 वर्ष), लारा वासवानी (11 वर्ष), ध्यान झुनझुनवाला (13 वर्ष), तनुश्री राठी (20 वर्ष), दिव्यांका भोसले (13 वर्ष), रयान संघवी(12 वर्ष) हे या लिलावात सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत.
स्पर्धेतील संघ व संघमालक असे आहेत - एएसआर डॉल्फिन्स (अमित रोपलेकर), जेट्स (राकेश नवानी), गोयल गंगा रियल रिच(अतुल गोयल), पोलो ॲक्वा वॉरियर्स (पूनम राठी), अद्विका परमार ऑल स्टार्स (हिरेन परमार व पायल भारतिया), एसके फ्लिपर्स (शैलेश रांका, समीर संघवी व कुणाल संघवी), जॅग्वार्स (मनप्रीत उप्पल व गौरव गढोक), अडवाणी स्प्लॅश टायटन्स (विजय अडवाणी)
या लीगबद्दल बोलताना पूना क्लबचे अध्यक्ष गौरव गढोक म्हणाले की, या स्पर्धेचे संपूर्ण स्वरूप अत्यंत रोमांचकारी व चुरशीचे असून लकी ड्रॉद्वारे एकूण 8संघांमधून प्रत्येकी 4संघांचे दोन गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील सर्वोत्तम सहा संघ आगेकूच करतील.शनिवार, दिनांक 5 एप्रिल रोजी ग्रँड फायनल्सचे आयोजन करण्यात आले आहे.
पूना क्लबच्या क्रीडा विभागाचे चेअरमन तुषार आसवाणी म्हणाले की, या स्पर्धेबद्दल क्लबच्या सभासदांमधील उत्सुकता कळसाला पोहोचली आहे. यामध्ये 135 क्लबमधील सदस्यांचा समावेश असून 6 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंतच्या खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच फ्रीस्टाईल, ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोक, 20 मीटर, 40 मीटर व रीले अशा विविध प्रकारच्या 120 स्पर्धाप्रकारांचा लीगमध्ये समावेश आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये अध्यक्ष गौरव गढोक, तुषार आसवानी (स्पर्धा संचालक) यांचा समावेश आहे.
Comments
Post a Comment