भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजमध्ये ग्लोबल रिसर्च परिषद



भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजमध्ये ग्लोबल रिसर्च परिषद 

पुणे:

भारती विद्यापीठाचे न्यू लॉ कॉलेज(पुणे), सोशल सायन्स अँड मॅनेजमेंट वेल्फेअर असोसिएशन (जबलपूर) आणि न्यू लॉ कॉलेजचा लॉ आर्टिजन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ३ दिवसीय ग्लोबल कॉन्फरन्स ऑन 'रिसर्च: अ सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टिगेशन' दि. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली.

ही परिषद भारती विद्यापीठाच्या विधी विद्याशाखेच्या अधिष्ठाता,न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. उज्वला बेंडाळे या परिषदेच्या संयोजिका होत्या. उपप्राचार्य डॉ. ज्योती धर्म आणि समन्वयक डॉ. विद्या ढेरे यांनी या परिषदेच्या आयोजनात सहकार्य केले.

सहायक प्राध्यापक आणि सहसंयोजिका श्रीमती रश्मी दुबे, विद्यार्थी समन्वयक मयंका पिल्लई आणि गर्व जग्याशी यांनी परिषदेसाठी योगदान दिले.

या परिषदेतील विशेष सत्रांमध्ये भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. विविध शाखांतील संशोधक व प्राध्यापकांना संशोधनाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली.

तीन दिवसांच्या या परिषदेत संशोधन पद्धती, सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टिगेशन, डेटा विश्लेषण, संशोधनातील नैतिकता आणि बहुविषयक दृष्टिकोन यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. तज्ज्ञांनी संशोधन प्रक्रियेत लागणाऱ्या आधुनिक तंत्रांचा उपयोग आणि समस्यांवरील वैज्ञानिक दृष्टिकोनावर मार्गदर्शन केले.

परिषद यशस्वी ठरली, आणि सहभागी संशोधकांनी त्यातून मिळालेल्या ज्ञानाबद्दल समाधान व्यक्त केले. शास्त्रोक्त पद्धतीने तथ्यांचा शोध घेण्याच्या आणि विवेकाधिष्ठित संशोधनाच्या महत्त्वावर भर देण्याचे उद्दिष्ट या परिषदेने प्रभावीपणे साध्य केले. आयोजक मंडळाने सर्व मान्यवर, तज्ज्ञ व सहभागी संशोधकांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी