विधायक पुणेरी रंग टिपण्यासाठी 'पुणे द सिटी ' संवाद उपक्रम---------------------'पुणे द सिटी ' संवाद उपक्रमाचे उदघाटन -----------------------तरूणांनी शहरविकासासाठी काम करावे :कुलगुरू प्रभात रंजन
पुणे :
पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव आणि नामांकित व्यक्तिमत्वाचे विधायक वैविध्य समोर आणण्यासाठी 'पुणे द सिटी ' या पॉडकास्ट संवाद उपक्रमाचे उदघाटन डी.वाय.पाटील विद्यापीठ(आकुर्डी)चे कुलगुरू प्रभात रंजन,निवृत्त कर्नल राजीव भरवान,आरजे सुमित, 'पुणे द सिटी 'चे संस्थापक आनंद केशव,उदय श्रीवास यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी खडकी येथे झाले.कुमार सुरेश,रुपम डे,राहुल भाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.'पुणे द सिटी' नावाच्या पॉडकास्ट संवाद कार्यक्रमाचा पहिला भाग निवृत्त कर्नल राजीव भारवान यांच्याशी झालेल्या रोचक संवादाने आणि आरजे सुमित यांच्या कौशल्यपूर्ण संचालनाने सजलेला आहे. या पॉडकास्टचा उद्देश श्रोत्यांना विविध विषयांवरील विचारप्रवर्तक चर्चांद्वारे आणि स्फूर्तिदायक अनुभवाद्वारे आकर्षित करणे आहे.
उदघाटन प्रसंगी बोलताना प्रभात रंजन म्हणाले,'तरूणांनी गर्दीचा भाग बनून राहू नये, आपल्या ध्येयासाठी, झपाटून काम करावे, मग कुणी वेडे म्हटले तरी चालेल.भारतातील, आणि अर्थातच पुण्यातील हुशार मुलांची आपल्या देशाला अधिक गरज आहे, तेव्हा त्यांनी, परदेशात शिक्षण जरूर घ्यावे, पण आपली कर्मभूमी देशातच निवडावी.ज्या शहरात राहतो, त्या शहराच्या विकासासाठी काम करावे. तरूणांनी रिस्क घ्यायला शिकले पाहिजे, तसेच पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे."
कर्नल राजीव भारवान म्हणाले,'तरुणांनी ब्रॅण्डच्या मागे लागू नये, जे आहे त्यात समाधान मानावे, तसेच टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर फार अवलंबून राहू नये, स्वतःच्या हाताने निर्मिती करण्यात जी मजा आहे, एक प्रकारची नशा आहे, ती तरूणांनी अनुभवली पाहिजे. उदय श्रीवास म्हणाले,'या पॉडकास्टच्या माध्यमातून पुण्यातील सर्व प्रश्नांवर आवाज उठवणे आणि त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, यासाठी या व्यासपीठाचा वापर तरूणांनी जास्तीत जास्त करून घ्यावा.आरजे सुमित यानेही उपस्थित पुणेकर,युवक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.आनंद केशव यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment