पक्षांतरबंदी कायद्याने’ अपात्र ठरल्यावरही, शिंदेंना मुख्यमंत्री ठेवण्याची भाषा…ही भाजपची मुजोरी व नैतिक दिवाळखोरी..! काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे दि २९ - ‘पक्षांतरबंदी मुळे’ अपात्र झाल्यावर देखील, शिंदेंना विधान परिषदेवर घेऊन मुख्यमंत्री ठेवण्याची भाषा सखेद आश्चर्य कारक, कायद्याची अनभिज्ञता दर्शवणारी व मुजोरीची असुन, भाजप कडुन बंडखोरांना एक प्रकारे बळ देण्याचा प्रयत्न करणारे व असंविधानिक कृत्यास बक्षीसी देणारे असल्याची टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एकनाथ शिंदे व आमदारांवर ‘पक्षांतर बंदी’ कायद्याने अपात्रतेची कारवाई झाली तरीही, भाजप त्यांना विधान परिषदेवर घेऊन ‘पुन्हा मुख्यमंत्री करेल’ या वक्तव्यावरील प्रतिक्रीयापर ते बोलत होते..!
भाजप नेत्यांवर, अवैध सत्तेच्या अस्तित्वासाठी, किती अगतिकतेने ‘मविआ सरकार पाडण्याच्या’ कुटनितीचे लंगडे समर्थन करन्याची पाळी आली असुन, बंडखोर आमदारांना खोटा धीर देण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे ही ते म्हणाले..!
‘पक्षांतरबंदी कायद्याने पुन्हा आमदार होण्यास ६ वर्षांचे निर्बंध ही लागु होतात’ हे कायद्याची पदवी घारण करणाऱ्यांनी विसरावे काय(?) असा सवाल ही त्यांनी केला.
‘राज्याची दिवाळखोरी, कर्जबाजारीपणा, मराठा आरक्षणाचे अपयश या सर्वांचे खापर भाजपला सोईने व स्वतः नामा निराळे राहून, महाराष्ट्रातील शिंदे / पवार या नेत्यांवर फोडायचे आहे व राज्यातील सत्तांध नेते या कारस्थानात आपण होऊन गोवले जात आहेत हे राज्याचे दुर्दैव आहे.. अशी टिका देखील काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!
Comments
Post a Comment