वारकऱ्यांची सेवा करत अभिनवमधील एन एस एस विद्यार्थ्यांनी अनुभवला माऊलींचा सहवास

वारकऱ्यांची सेवा करत अभिनवमधील एन एस एस विद्यार्थ्यांनी अनुभवला माऊलींचा सहवास  

  आंबेगाव बु ||येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एन एस एस विभागातर्फे मार्केटयार्ड येथे वारकऱ्यांची सेवा करत साक्षात माऊलींचा सहवास अनुभवला.
  माऊलींच्या सेवेसाठी आसुसलेल्या तरुण विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांसाठी स्वतः जेवण बनवण्यासाठी आणि त्याचबरोबर जेवण वाढण्यासाठी मदत केली."वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाची सेवा" आणि हि सेवा करण्याचे भाग्य आम्हाला या वयात मिळाले यासाठी आम्ही शाळेचे ,नगरसेवक प्रवीण चोरबेले सर यांचे आणि आई वडिलांचे खूप खूप आभारी आहे ,असे विद्यार्थी म्हणाले.गेली १५ वर्ष एन एस एस चे विद्यार्थी वारकऱ्यांची सेवा करत आहेत.या सेवेसाठी ४३ एन एस एस चे विद्यार्थी सहभागी झाले होते.या उपक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे सहकार्य लाभले.
       या सामाजिक उपक्रमासाठी प्राचार्या वर्षा शर्मा,कार्यक्रम अधिकारी मनोजकुमार भकत यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप ,सेक्रेटरी सुनीता जगताप , सहासेक्रेटरी निर्मोही जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा आणि नगरसेवक प्रवीण चोरबेले आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा