पुणे सिटी मॅरेथॉन स्पर्धेत तेजस्विनी लांबकाने, अर्चना जाधव, अंजली भालिंगे, कुणाल वाघ, साक्षी जडियाल, ब्रिगेडियर हरीश इसरानी, चरण सिंग, साधना यादव यांना विजेतेपद

पुणे, 3 मार्च 2024: 'द पूना क्लब लिमिडेट' यांच्या तर्फे व सदर्न कमांड पुणे यांच्या सहकार्याने आयोजित पुणे सिटी मॅरेथॉन स्पर्धेत तेजस्विनी लांबकाने, अर्चना जाधव, अंजली भालिंगे, कुणाल वाघ, साक्षी जडियाल,ज्योती गवते, ब्रिगेडियर हरीश इसरानी, चरण सिंग, साधना यादव, सुलता कामथ, सुरेश शर्मा, भास्कर कांबळे यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. 

स्पर्धेत 12800 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. हि स्पर्धा 21 किमी., 10किमी., पाच किमी. आणि तीन किमी. अशा चार प्रकारात पार पडली. स्पर्धकांना 21किमी साठी बंडगार्डन रस्त्यावरील पूना क्लब येथून सुरुवात होणार असून सदर्न कमांड मार्गे, मनोज पांडे एनक्लेव्ह, लष्कर पोलीस स्टेशन रोड, हायलँड इव्ह, परेड ग्राउंड रोड, मिल्खा सिंग स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आर्मी कॅन्टीन, सदर्न कमांड सिंग्नल, घोरपडी बाजार पोस्ट ऑफिस, जेजे चेंबर्स, ए १ रोलर स्केटिंग रोड प्रॅक्टिस येथून पुन्हा पूना क्लब मैदान असा मार्ग पूर्ण करावयाचा होता. 

21किलोमीटर महिला गटात 18 ते 30 वयोगटात तेजस्विनी लांबकाने(01:20:41से) ने प्रथम क्रमांक पटकावला. तर अर्चना जाधव(01:21:25से) व अश्विनी जाधव(01:22:41से)यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. 31 ते 45 वयोगटात ज्योती गवते(01:30:26से) हिने विजेतेपद पटकावले. 46 ते 55वयोगटात वंदना सिंग(01:53:03से) हिने पहिला क्रमांक मिळवला. 56 ते 70वयोगटात अंजली भालिंगे(01:56:14से) हिने आणि 71 वर्षे वयोगटात सुलता कामथ(03:02:35से) यांनी अव्वल क्रमांक पटकावला. 

21किलोमीटर पुरुष 18 to 30 वयोगटात कुणाल वाघ(01:09:14से) याने विजेतेपदाचा मान पटकावला. 31 ते 45वयोगटात अनंत गावकर(01:10:14से)ने पहिला क्रमांक पटकावला. 46 to 55 वयोगटात भास्कर कांबळे(01:18:21से) आणि 56 ते 70 वयोगटात सुरेश शर्मा(01:30:11से) याने प्रथम स्थान पटकावले. 

10किलोमोटर मध्ये महिला गटात 18 ते 30 वयोगटात साक्षी जडीयाल(37:06:1से), 31 ते 45वयोगटात आसा टीपी(39:57:4से), 46 ते 55वयोगटात इंदू टंडन(47:58:3से), 56 ते 70 वयोगटात दुर्गा सिल(57:07:8से) यांनी अव्वल क्रमांक मिळवला. याच पुरुष गटात 18 ते 30 वयोगटात आसिफ खान (30:45:6से), 31 ते 45वयोगटात चंद्रकांत मनवाडकर(33:26:7से), 46 ते 55वयोगटात गोरधन मीना(36:29:7से), 56 ते 70वयोगटात चरण सिंग(39:46:9से), 71 वर्षावरील अधिक गटात ब्रिगेडियर हरीश इसरानी(30:41:0से) यांनी विजेतेपद पटकावले. 

5किलोमोटरमध्ये महिला गटात 12 वर्षे व त्यावरील वयोगटात अबोली वास्के(00:20:26से), तर. 13 ते 17 वयोगटात साधना यादव(00:19:09से) यांनी विजेतेपदाला गवसणी घातली. पुरुष गटात 12 वर्षे व त्यावरील वयोगटात अनिकेत जंगले(00:17:11से), याने तर, 13 ते 17 वयोगटात रोहित बिन्नर(00:15:32से) याने प्रथम क्रमांक पटकवला. 

याआधी 21किलोमीटरसाठी महाराष्ट्र पोलीसचे अतिरिक्त पोलिस उपमहासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यात आले. तर, 10किमी साठी आयकर विभागाच्या मुख्य आयुक्त रीना झा त्रिपाठी यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आले. 5किलोमीटरसाठी लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, जीओसी इन सदर्न कमांड यांच्या हस्ते आणि 3 किमीसाठी एडीजी सुनील रामानंद, वायरलेस पोलीस महाराष्ट्र, पुना क्लबचे अध्यक्ष सुनील हांडा, पुना क्लबचे उपाध्यक्ष गौरव गढोक, दोराबजी चॅरिटेबल ट्रस्टचे जहांगीर दोराबजी, रेस डायरेक्टर शैलेश रांका यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आले. Iस्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्यांना पदके, रोख रक्कम देण्यात आली. बंडगार्डन रस्त्यावरील पूना क्लब येथून रविवारी (ता. 3) सकाळी पाच वाजता २१ किमी मॅरेथॉनला सुरुवात होईल. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आयकर विभागाच्या मुख्य आयुक्त रीना झा त्रिपाठी, इंदू दुबे, डीआरएम, रेल्वे, पुना क्लबचे अध्यक्ष सुनील हांडा, पुना क्लबचे उपाध्यक्ष गौरव गढोक, दोराबजी चॅरिटेबल ट्रस्टचे जहांगीर दोराबजी, रेस डायरेक्टर शैलेश रांका यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमेय कुलकर्णी, मनिष मेहता, पंकज शहा आणि क्लबचे आदी मान्यवर उपस्थित होते. दोराबजी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी एकझ्युट केला होता. स्पर्धेला सदर्न कमांड हेड क्वार्टर, पुणे महानगरपालिका, इन्कम टॅक्स स्पोर्ट्स अॅण्ड रेक्रिशन क्लब, पुणे जीएसटी विभाग, पुणे पोलिस, भारतीय वायू सेना, कारागृह विभाग,.वायरलेस यांचा मॅरेथॉनला सहयोग लाभला होता. 

निकाल: प्रथम, द्वितीय व तृतीय यानुसार: 
21किमी: महिला: 
18 ते 30 वयोगट: 1.तेजस्विनी लांबकाने(01:20:41से), 2.अर्चना जाधव(01:21:25से), 3.अश्विनी जाधव(01:22:41सेकंद);
31 ते 45 वयोगट: 1.ज्योती गवते(01:30:26से), २.मनिषा जोशी(01:34:43से), ३.रंजना पवार(01:43:33से);
46 ते 55 वयोगट: 1.वंदना सिंग(01:53:03से), २.विद्या धापोडकर(01:56:04से), ३.वंदना टंडन(02:02:39से);
56 ते 70वयोगट: 1.अंजली भालिंगे(01:56:14से), २.तारु मतेती(02:15:04से), ३.दक्षा राठोड(02:44:32से);
71 वयोगट : 1.सुलता कामथ(03:02:35से);
21किमी: पुरुष: 
18 to 30 वयोगट: 1.कुणाल वाघ(01:09:14से), २.अनिल जिंदाल(01:15:23से), ३.निखिल सहानी(01:16:10से);
31 ते 45 वयोगट: 1.अनंत गावकर(01:10:14से), 2.चांगदेव लाटे(01:10:25से), 3.विशाल कांबीरे (01:10:55से);
46 to 55 वयोगट: 1.भास्कर कांबळे(01:18:21से), २.समीर कोळ्या(01:24:00से.), ३.दत्तात्रय जयभाय(01:4:34से);
56 ते 70 वयोगट: 1.सुरेश शर्मा(01:30:11से), 2.तुकाराम नाईक(01:32:37से),3.उदय बोभाटे(01:34:34से);


10किमी: महिला गट:  
18 ते 30 वयोगट: 1.साक्षी जडीयाल(37:06:1से), 2.प्राजक्ता गोडबोले(37:09:8से), 3.ज्योती(38:04:6से);
31 ते 45 वयोगट: 1.आसा टीपी(39:57:4से), 2.निकिता नागपुरे(41:22:8से), 3.ज्योती ठाकरे(44:37:9से);
46 ते 55वयोगट:1. इंदू टंडन(47:58:3से), 2.सुचिता अजितसारिया(48:41:5से), 3.सुमित्रा जोशी(52:29:1से);
56 ते 70 वयोगट: 1.दुर्गा सिल(57:07:8से), 2.ज्योतिप्रोवा खाणीकर(57:39:8से), 3.लक्ष्मी घाटगे(01:32:9से);

10किमी: पुरुष गट: 
18 ते 30 वयोगट: 1.आसिफ खान (30:45:6से), 2.सौरव तिवारी (30:51:5से), 3.रामेश्वर मुंजाळ(31:30:7से);
31 ते 45 वयोगट: 1.चंद्रकांत मनवाडकर(33:26:7से), 2.चिंतामण गायकवाड(33:48:0से), 3.शिवप्रताप प्रजापती(35:37:0से);
46 ते 55 वयोगट: 1.गोरधन मीना(36:29:7से), 2.आरबीएस मोनी(37:09:8से), 3.रणजित काणबरकर(38:14:0से);
56 ते 70 वयोगट: 1.चरण सिंग(39:46:9से), 2.मुकेश राणा(40:48:9से), 3.पांडुरंग चौगुले(41:55:4से);
 71 वर्षावरील अधिक गट:1.ब्रिगेडियर हरीश इसरानी(30:41:0से), 2.शिवाजी घारे(32:43:1से.)

5किमी: महिला गट: 
12 वर्षे व त्यावरील वयोगट: 1.अबोली वास्के(00:20:26से), 2.रिया शिंदे(00:22:29से), 3.आराद्या वास्के(00:23:33से);
13 ते 17 वयोगट: 1.साधना यादव(00:19:09से), 2.प्रिया गुळवे(00:19:38से), 3.अर्शिया पवार(00:21:04से);

5किमी: पुरुष गट: 
वर्षे व त्यावरील वयोगट: 1.अनिकेत जंगले(00:17:11से), 2.मेघराज हिरेमठ(00:20:13से); 3.निरंजन मरकड(00:20:45से);
13 ते 17 वयोगट: 1.रोहित बिन्नर(00:15:32से), 2.अभिनंदन सूर्यवंशी(00:15:48से); 3.बिरुदेव कोळेकर(00:16:26से).

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी