निवडणुक काळांत’ ईडी अघिकाऱ्यांचे वेडे चाळे लोकशाहीस मारक..! सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी..! - काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे दि ४ -
देशातील ५ राज्यातील “निवडणुक_कार्यप्रणाली” सुरू झालेवर, सरकारी ईडी, सीबीआय तपासयंत्रणांचा केंद्रातील सत्ताघारी भाजप कडुन पुरेपूर व जाणीवपुर्वक ‘राजकीय - गैरवापर’ होत असुन राजस्थान, छत्तीसगढ मध्ये याची प्रचिती येत आहे.
सत्तापक्षास तपासाची पुर्ण मुभा व मोकळीक असतांनाही, गेल्या सु ९॥ वर्षात कारवाई करून, दोषींना शासन केल्याची उदाहरणे नगण्य आहेत.
मात्र निवडणुक काळातच् प्रतिपक्षाचे विरोधात, बनावट कुंभांडे रचुन, प्रतिपक्षास बदनाम व नामोहरम करण्याचे व त्यांचे प्रचार कार्यात रोडा घालण्याचे लोकशाही विरोधी - कृत्य केंद्रातील भाजपच्या शीर्ष नेतृत्वाकडुन होत आहे याचा काँग्रेस पक्ष निषेध करत असुन, ‘विदेशात मदर ॲाफ डेमॅाक्रसी म्हणुण स्वतःची पाठ थोपटून धेणारे देशात मात्र लोकशाहीची भ्रुणहत्या करत असल्याची प्रखर टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस राज्यप्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
लोकशाहीच्या संरक्षणा करीता, संविधानिक मार्गाने होणाऱ्या निवडणुका खुल्या निष्पक्ष वातावरणात होणे अपेक्षीत आहे.
मात्र निवडणुक प्रक्रिया सुरु झालेवर, केंद्रातील सत्तापक्षाच्या अनैतिक व अवैध हेतुंच्या अधीन होऊन “Enforcement Director’ हे प्रतीपक्षाच्या विरोधात अडथळे आणत, त्यांना तथ्यहीन आरोपांद्वारे बदनाम करण्याच्या ‘भाजपच्या कटकारस्थानात’ सहभागी झाले असुन, सत्तापक्षाचे बटुक झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीच्या अस्तित्वासाठी ‘निवडणुक काळातील’ ईडी अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीची गांभीर्याने दखल घ्यावी व ‘निवडणुक काळातील ईडी कारवायां बाबत’ आचारसंहितेचे बंधन ‘निवडणुक आयोगाने’ देखील निश्चित केले पाहीजे, अशी मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!
◦
Comments
Post a Comment