पुरस्कारातून प्रेरणा, व्यवसायातून स्वावलंबनाचा संदेश; महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळा 2026 संपन्न
पुरस्कारातून प्रेरणा, व्यवसायातून स्वावलंबनाचा संदेश; महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळा 2026 संपन्न पुणे : पत्रकार भवन, पुणे येथे आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन आयोजित “महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळा 2026” हा भव्य आणि प्रेरणादायी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समाज, उद्योग, कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक सेवा, शिक्षण आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास मॉडेल | सिने अभिनेत्री | टेलिव्हिजन कलाकार मा. अक्षता राजेंद्र खरटमोल यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. अक्षता यांनी मुक्ताई, अभंग तुकाराम यांसारख्या चित्रपटांसह ज्ञानेश्वर माऊली आणि आशीर्वाद तुझा एकवीरा आई यांसारख्या मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. तसेच उद्योजक अभिषेक बोत्रे यांची विशेष उपस्थिती लाभली. आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक गणेश विटकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना “महाराष्ट्र भूषण सन्मान 2026” प्रदान करून गौरविण्यात आले. समाजात सकारात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कार्य...