Posts

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. दुधभाते यांच्या ‘नेत्रकोष’चे प्रकाशन** मुंबईत ‘नेत्रकोष’ पुस्तकाचे प्रकाशन; डोळ्यांच्या आरोग्यावर सोप्या भाषेत मार्गदर्शन

Image
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. दुधभाते यांच्या ‘नेत्रकोष’चे प्रकाशन* * मुंबईत ‘नेत्रकोष’ पुस्तकाचे प्रकाशन; डोळ्यांच्या आरोग्यावर सोप्या भाषेत मार्गदर्शन मुंबई / पुणे, प्रतिनिधी – पुण्यातील प्रख्यात नेत्ररोग तज्ञ डॉ. अनिल दुधभाते लिखित ‘नेत्रकोष’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रसन्न वातावरणात पार पडले. साध्या आणि सोप्या भाषेत लिहिलेल्या या पुस्तकाचे अवलोकन करताना मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. या पुस्तकाला ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने तसेच प्रसिद्ध ‘दीक्षित डाएट’ संकल्पनेचे जनक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची प्रस्तावना लाभली आहे. ‘नेत्रकोष’ या पुस्तकामध्ये डोळ्यांच्या विविध आजारांबाबत अत्यंत सोप्या आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक आजाराचे कारण, तो टाळण्यासाठी घरच्या घरी करता येणाऱ्या उपाययोजना, तसेच आजार झाल्यास प्राथमिक पातळीवर कोणती काळजी घ्यावी आणि नेत्रतज्ञांचा सल्ला केव्हा घ्यावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. डॉ. दुधभाते यांच्या सुमारे १५ वर्षांच्या अनुभव...

Janhvi Kapoor Confesses Her Love for Mangoes with Theobroma, Sparks a Summer of Sweet Confessions

Image
Janhvi Kapoor Confesses Her Love for Mangoes with Theobroma, Sparks a Summer of Sweet Confessions National, 6th May, 2026: When it comes to mango season, there are no rules, no limits, and definitely no such thing as too much. Across the country, mango love shows up in cravings at odd hours, zero willingness to share, and always going back for one more bite. And joining in on this full-blown mango obsession is Janhvi Kapoor, who has a confession to make, she’s just as all-in as the rest of us. This summer, the actor is seen giving in to her unapologetic love for mango desserts, proving that when it comes to mangoes, there’s no such thing as too much. From that first bite to the last swipe of cream, Janhvi is all in, making it clear that mango love isn’t subtle, it’s a little extra, a little indulgent, and completely irresistible. And she’s not alone. Across the country, mango season brings out the same energy, little rituals, big cravings, and slightly crazy behaviour that ...

टोटल स्पोर्ट्स अँड फिटनेसच्या पुण्यात फ्लॅगशिप स्टोअरला प्रारंभ वाढत्या क्रीडा व फिटनेस मागणीवर भर

Image
टोटल स्पोर्ट्स अँड फिटनेसच्या पुण्यात फ्लॅगशिप स्टोअरला प्रारंभ  वाढत्या क्रीडा व फिटनेस मागणीवर भर पुणे, २ मे २०२६: टोटल स्पोर्ट्स ॲन्ड फिटनेस या ख्यातनाम आघाडीच्या मल्टी-ब्रँड स्पोर्ट्स आणि फिटनेस रिटेल चेनने पुण्यात आपले फ्लॅगशिप स्टोअर सुरू केले आहे. देशात वेगाने वाढत असलेल्या क्रीडा, फिटनेस आणि लाइफस्टाइल मार्केटमध्ये विस्तार करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. हे स्टोअर पिंपरी चिंचवडमधील भूमकर चौक, रायझ अल्टा प्राइम प्लाझा येथे सुरू करण्यात आले आहे. क्रीडाप्रेमी, फिटनेस करणारे आणि सक्रिय जीवनशैली जगणाऱ्या लोकांसाठी हे एक सोयीचे आणि सर्व सुविधा असलेले ठिकाण ठरणार आहे. सुमारे पाच हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या या स्टोअरमध्ये शंभर पेक्षा जास्त ब्रँड्सची पाच हजारहून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत. नवशिक्या व्यक्तींपासून ते व्यावसायिक खेळाडूंपर्यंत प्रत्येकासाठी येथे योग्य पर्याय आहेत. क्रीडा साहित्य, फिटनेस उपकरणे आणि अ‍ॅक्टिव्ह लाइफस्टाइलशी संबंधित अनेक प्रकारची उत्पादने एकाच छताखाली मिळतात. सन २००३ पासून काम करत असलेल्या या ब्रँडवर आजपर्यंत सहा लाखांहून अ...

*नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा द्या*— *रमेश बागवे*— शक्ती कायद्याची तत्काळ अमलबजावणी करा — रमेश बागवे

Image
⸻ *नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा द्या*— *रमेश बागवे* — शक्ती कायद्याची तत्काळ अमलबजावणी करा — रमेश बागवे  पुणे, दि. ४ मे २०२६ : मौजे नसरापूर (ता. भोर) येथील चार वर्षांच्या निष्पाप बालिकेवर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणी आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच शक्ती कायद्याची अमलबजावणी तत्काळ करावी अशी ठाम मागणी मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक व माजी मंत्री रमेश बागवे यांनी आज केली आहे .पुणे शहर मातंग एकता आंदोलनाच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले .      गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात महिलांवर व अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नसरापूर येथील ही घटना अत्यंत अमानवीय व संतापजनक असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.     याचबरोबर खेड-खालुंब्रे परिसरातील तीन वर्षांच्या बालकावर झालेल्या अत्याचार व हत्या प्रकरणाचाही उल्लेख करत, अशा घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगण्यात आले. गुन्हेगार...

महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुण्यातील एम. ए. रंगूनवाला डेंटल कॉलेजमध्ये अत्याधुनिक प्री-क्लिनिकल डेंटल लॅबचे उद्घाटन

Image
महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुण्यातील एम. ए. रंगूनवाला डेंटल कॉलेजमध्ये अत्याधुनिक प्री-क्लिनिकल डेंटल लॅबचे उद्घाटन पुणे, ६ मे २०२६ : एम. ए. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर, पुणे हे आपले २५ वे वर्ष साजरे करत असताना, आधुनिक दंत शिक्षणाच्या दिशेने कॉलेज आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहे. महाराष्ट्र सरकारचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि एम.यू.एच.एस., नाशिकचे प्र-कुलगुरू माननीय श्री. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कॉलेजच्या अत्याधुनिक प्री-क्लिनिकल प्रोस्थोडॉन्टिक्स आणि प्री-क्लिनिकल कन्झर्व्हेटिव्ह डेंटिस्ट्री प्रयोगशाळांचे उद्घाटन ७ मे २०२६ रोजी आझम कॅम्पस, पुणे येथे होणार आहे. हे उद्घाटन कॉलेजच्या २० व्या पदवीदान समारंभाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. नवीन प्री-क्लिनिकल प्रयोगशाळा दंतवैद्यकीय विद्यार्थ्यांना रुग्णांवर उपचार सुरू करण्यापूर्वी प्रत्यक्ष सरावाचा अनुभव मिळावा या उद्देशाने तयार करण्यात आल्या आहेत. या प्रयोगशाळेत १०० पूर्णपणे सुसज्ज फॅन्टम हेड वर्कस्टेशन्स आहेत. प्रत्येक वर्कस्टेशनमुळे विद्यार्थी प्रत्यक्ष क्लिनिकल कामासारख्या ...

*बुद्ध पौर्णिमानिमित्त युवाशक्ती संघटनेच्या वतीने शरबत वाटप व शालेय साहित्य वाटप

Image
*बुद्ध पौर्णिमानिमित्त युवाशक्ती संघटनेच्या वतीने शरबत वाटप व शालेय साहित्य वाटप* तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमे निमित्त ताडीवाला रोड लुंबिनी नगर येथे शरबत वाटप तसेच का. सोनूभाऊ अडसूळ यांच्या स्मरणार्थ परिसरातील गरजू होतकरू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे, भीम छावा संघटनेचे संस्थापक शामभाऊ गायकवाड, सोनूभाऊ निकाळजे, दशरथ शेट्टी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी सदर विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तक, पेन, पेन्सिल व कंपासपेटी आदी साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते प्रतिक कांबळे यांनी केले. सदर प्रसंगी गणेश माने, सुनील जंगले, अलताफ शेख, पांडुरंग बनसोडे, निखिल जगताप, सकलेन शेख आदी उपस्थित होते.

एमक्युअर फामास्युटिकल्सचा आर्थिक निकाल जाहीर; आर्थिक वर्ष २०२६ मध्ये उत्कृष्ट कामिगरीची नोंदकंपनीच्या वार्षिक महसूलात १ अब्ज अमेरिकन डॉलर्सची भर

एमक्युअर फामास्युटिकल्सचा आर्थिक निकाल जाहीर; आर्थिक वर्ष २०२६ मध्ये उत्कृष्ट कामिगरीची नोंद कंपनीच्या वार्षिक महसूलात १ अब्ज अमेरिकन डॉलर्सची भर चौथ्या तिमाहीत आणि संपूर्ण आर्थिक वर्षाच्या कालावधील महसुलात अनुक्रमे १६.७ आणि १६.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात ३६ टक्के आणि पूर्ण वर्षासाठी ४१ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली.   पुणे, ५ मे, २०२६: एमक्युअर फार्मास्युटिकल्सने (BSE:544210, NSE: EMCURE) आर्थिक निकाल आज जाहीर केले. ३१ मार्च २०२६ रोजी चौथ्या तिमाहीचा कालावधी संपला. कालावधीपर्यंतचे एकत्रित निकाल आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत. याचसोबत संपूर्ण आर्थिक वर्षाचा लेखाजोगादेखील सादर करण्यात आला आहे. एमक्युअर फार्मास्युटिकल्स कंपनीच्या आर्थिक कामगिरीबद्दल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश मेहता यांनी माहिती दिली. ते म्हणाले, आमच्या पाच वर्षांच्या धोरणात्मक योजनेचे पहिले वर्ष यशस्वी ठरले आहे. आर्थिक वर्ष २०२६मध्ये कंपनीने १ अब्ज डॉलरपेक्षा जास्त महसूल मिळवला. यात १६.६ टक्क्यापर्यंत वाढ दिसून आली. कंपनीने जागतिक बाजारपेठेत मोठी प्र...