सिटीग्रुप इंक. (NYSE: C)सिटी आणि क्रेडेंडो यांच्याकडून इंडिगोच्या आठ एअरबस विमानांसाठी ३२८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स महत्त्वपूर्ण फायनान्सिंगची घोषणा



 

 

सिटीग्रुप इंक. (NYSE: C)

सिटी आणि क्रेडेंडो यांच्याकडून इंडिगोच्या आठ एअरबस विमानांसाठी ३२८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स महत्त्वपूर्ण फायनान्सिंगची घोषणा

 

भारताला जागतिक विमान भाडेतत्त्वावरील (लीजिंग) केंद्र बनवण्याच्या भारत सरकारच्या दृष्टिकोनाला अनुसरून हा व्यवहार जगातील पहिला क्रेडेंडो-विमाकृत एव्हिएशन फायनान्सिंग आणि गिफ्ट आयएफएससीच्या माध्यमातून संरचित केलेला पहिला एक्सपोर्ट क्रेडिट एजन्सी (ईसीए)-समर्थित एअरक्राफ्ट फायनान्सिंग ठरला आहे

 

ऑक्टोबर १३, २०२६

राष्ट्रीय - सिटी आणि बेल्जियमची एक्सपोर्ट क्रेडिट एजन्सी क्रेडेंडो यांनी आज इंडिगोच्या आठ एअरबस विमानांसाठी (सहा A321s आणि दोन A320s) ३२८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स वित्तपुरवठ्याची (फायनान्सिंग) यशस्वी पूर्तता झाल्याची घोषणा केली. इंडिगो नेटवर्क आणि विमानांच्या ताफ्याच्या आकारमानानुसार भारतातील सर्वात मोठी, तसेच जगातील सर्वात वेगाने वाढणारी विमान कंपनी आहे. या संरचनेअंतर्गत, सिटीने एकमेव मॅन्डेटेड अरेंजर, ईसीए समन्वयक आणि एकमेव कर्जदाता म्हणून भूमिका बजावली आहे, तसेच या फायनान्सिंगला क्रेडेंडोच्या पत विम्याचे (क्रेडिट इन्शुन्स) पाठबळ मिळाले आहे.

 

इंडिगोची उपकंपनी इंटरग्लोब एव्हिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस आयएफएससी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून पूर्ण झालेला हा व्यवहार जागतिक पातळीवर क्रेडेंडो-विमाकृत पहिला एव्हिएशन फायनान्सिंग आणि गिफ्ट आयएफएससी लीजिंग संरचनेद्वारे झालेला पहिला ईसीए-समर्थित एअरक्राफ्ट फायनान्सिंग ठरला आहे, ज्यामुळे भारतातील एव्हिएशन फायनान्स क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा प्रस्थापित झाला आहे.

 

इंडिगोच्या महत्त्वाकांक्षी विमान ताफा विस्तार योजनांना गिफ्ट आयएफएससी प्लॅटफॉर्मद्वारे पाठबळ देणारे अनुकूल निधी सोल्यूशन उपलब्ध करून देण्यासाठी हे विशेष फायनान्सिंग सोल्यूशन सिटी आणि क्रेडेंडोने इंडिगो व एअरबस यांच्या जवळच्या भागीदारीतून संयुक्तपणे संकल्पित, संरचित आणि विकसित केले, ज्यामध्ये सिटीचे ईसीए संरचना आणि एव्हिएशन फायनान्स बाजारपेठेतील अग्रगण्य कौशल्य, तसेच क्रेडेंडोच्या पत विमा क्षमतांचा प्रभावी वापर करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सिटी, क्रेडेंडो आणि इंडिगोसोबत जवळून काम करत एअरबसने या महत्त्वपूर्ण फायनान्सिंगला पाठबळ देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हा व्यवहार निधीची उपलब्धता वाढवणाऱ्या आणि आपल्या विमान कंपनी ग्राहकांच्या वाढीच्या आकांक्षांना पाठबळ देणाऱ्या नाविन्यपूर्ण फायनान्सिंग सोल्यूशन्सचा विकास करण्याप्रती एअरबसची कटिबद्धता आणखी अधोरेखित करतो.

 

भारताच्या वेगाने विस्तारणाऱ्या विमान वाहतूक क्षेत्राच्या फायनान्सिंगच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून त्याचे स्थान अधिक दृढ करण्यासाठी नाविन्यपूर्ण आंतरराष्ट्रीय भांडवल व निर्यात पत साहाय्याचे वाढते महत्त्‍व या महत्त्वपूर्ण व्यवहारामधून दिसून येते. इंडिगोसाठी ही सुविधा ताफा आणि नेटवर्क वाढीसाठी स्पर्धात्मक, तसेच वैविध्यपूर्ण दीर्घकालीन निधी स्रोत प्रदान करते. तसेच यामधून पहिलेच फायनान्सिंग सोल्यूशन उपलब्ध करून देण्यात आणि भारतातील विमान वाहतूक बाजारपेठेसाठी उपलब्ध निधी पर्यायांची व्याप्ती वाढवण्यात सिटी, क्रेडेंडो, इंडिगो आणि एअरबस यांच्यातील दृढ सहयोग दिसून येतो.

 

सिटीचे भारतातील सीईओ व बँकिंग हेड आणि सब-कॉन्टिनंट सब-क्लस्टर प्रमुख के. बालसुब्रह्मण्यन म्हणाले, “भारत सरकारने गिफ्ट सिटीच्या माध्यमातून विमान भाडेतत्त्वावर देण्याला (लीजिंग) स्पष्ट धोरणात्मक प्राधान्य दिले आहे आणि लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहनांमुळे भारताला विमान लीजिंगसाठी आकर्षक ठिकाण म्हणून प्रस्थापित करण्यास मदत झाली आहे. हा व्यवहार त्या दृष्टिकोनाचे प्रत्यक्ष कृतीतील उत्तम उदाहरण आहे. सिटीचे सीमापार विमान वाहतूक व ईसीए फायनान्सिंग कौशल्य, क्रेडेंडोचा पत विमा आणि इंडिगोचा गिफ्ट आयएफएससी प्लॅटफॉर्म यांचा मेळ घालून आम्ही अशा प्रकारचे पहिलेच सोल्यूशन दिले आहे, जे भारतातील विमान वाहतूक क्षेत्राला ईसीए-समर्थित आंतरराष्ट्रीय तरलतेच्या विपुल स्रोताशी जोडणारा महत्त्वाचा नवा मार्ग खुला करते आणि भारताच्या


Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा