तत्वा शिवाय राजकारण' (सिध्दांत बिना राजनिती) महात्मा गांधींच्या ७ पापे (7 Sins) पैकी १ होते*.. - काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी



*राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त*

*पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आदरांजली अर्पण.*

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आज काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्व विभागाचे अध्यक्ष *प्रशांत जगताप* यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी *प्रशांत जगताप* म्हणाले की, ‘‘अनेक देशांनी महात्मा गांधींच्या विचारांना मानले आहे. पण काही प्रवृत्तींकडून गांधींच्या मृत्यूनंतरही गांधींना मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. गांधींनी मानवता, समता आणि नैतिकता या तीन मूलभूत मूल्यांवर भारतीय स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. शांततेच्या मार्गाने जनशक्तीचे दर्शन जगाला घडवून दिले. शेवटच्या माणसांचा प्रथम विचार गांधींनी केला. आज विविध मार्गांनी महात्मा गांधी यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न केला जातोय, ही मोठी खंत आहे. भारताचे सर्वोच्च नेतेही परदेशात गेल्यावर महात्मा गांधी यांचे नाव घेऊन त्यांच्या पुतळ्याला वंदन करतात, मात्र काही अंधभक्त गांधींच्या विचारांची हत्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

साधी राहणी, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाला कठीण परिस्थितीत धैर्याने नेतृत्व दिले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात त्यांनी देशवासीयांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यांनी दिलेला *“जय जवान, जय किसान”* हा संदेश भारताच्या सुरक्षेसोबतच अन्ननिर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला. जवान देशाचे रक्षण करतो, तर शेतकरी देशाचे पोट भरतो, हा व्यापक संदेश या घोषणेतून मिळतो.

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातून आपल्याला प्रामाणिकपणा, शिस्त, साधेपणा, कर्तव्यभावना आणि देशसेवा यांचे महत्त्व शिकायला मिळते. त्यांच्या जयंतीनिमित्त केवळ पुष्पहार अर्पण करून थांबणे योग्य नाही; त्यांच्या विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात स्वीकार करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.’’

यावेळी काँग्रेस विचार विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण डावर, प्रदेश खजिनदार ॲड. अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, उपाध्यक्ष कैलास गायकवाड, बाळासाहेब मारणे, नीता रजपूत, वैशाली धिमधिमे, डॉ. स्नेहल पाडळे, सीमा सावंत, अनुसया गायकवाड, ऋग्वेदिता सपकाळ, कोमल धिमधिमे, आबा जगताप, लतेंद्र भिंगारे, कृष्णा सोनकांबळे, अण्णा गोसावी, ॲड. बाळासाहेब बाणखेले, दिलीप लोळगे, मनिषा फाटे, राजेंद्र पेशने, हरिदास अडसूळ, विजय तिकोणे, शाबिर तांबोळी, खलील सय्यद, बाबासाहेब पाटील, शंकर वडणे, सुदर्शन खरात, योगेश भोकरे, मदन कोठुळे, आशुतोष पवार, मारूती माने, सागर धावडे, संतोष जोशी, अमित कांबळे, दिपक ओव्‍हाळ, नरसिंह आंदोली आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.*'बापूं'च्या 'लोककल्याणकारी राज्याची संकल्पना साकारणे' हीच् सुमनांजली* ..! 

'*तत्वा शिवाय राजकारण' (सिध्दांत बिना राजनिती) महात्मा गांधींच्या ७ पापे (7 Sins) पैकी १ होते*.. 
                - काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी 

 यांनी काढले. 
"*पुणे शहर जिल्हा काँग्रेस तर्फे महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात"* ते बोलत होते. 
राज्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त माध्यमांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करून त्यांना आदरांजली अर्पण केली ही समाधानाचीच बाब आहे. मात्र, एवढेच पुरेसे नाही. सत्य, अहिंसा, स्वदेशी, सत्याग्रह, ग्रामस्वराज्य, नैतिकता या मूल्यांच्या आधारावर महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात राजेशाही पद्धती न राहता लोकशाहीच्या आधारावर लोककल्याणकारी राज्य निर्माण व्हावे, अशी त्यांची भावना होती, हे देखील गोपाळदादा यांनी निदर्शनास आणले. 
सध्याच्या काळात लोकशाही मूल्य आणि लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेची पायमल्ली होताना दिसून येत आहे. हे प्रकार रोखून महात्मा गांधी यांच्या विचारानुसार आचरण करून त्यांच्या स्वप्नातील भारताची उभारणी करणे, राजकारण्यांसह भारताचे नागरिक म्हणून आपले सर्वांचेच कर्तव्य आहे, असे मत तिवारी यांनी व्यक्त केले. 
 पंतप्रधान पदाची जबाबदारी घेण्यापूर्वी रेल्वेमंत्री असताना एका रेल्वे अपघातातची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता ही बाब सध्याच्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे अशी अपेक्षाही तिवारी यांनी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी