नुपूर नाद’ च्या विलोभनीय सादरीकरणामुळे श्रोते मंत्रमुग्ध

‘नुपूर नाद’ च्या विलोभनीय
 सादरीकरणामुळे श्रोते मंत्रमुग्ध 

पुणे दिनांक १६ ऑक्टोबर २०२६
विविध अभंग व रागांच्या तालांवर सादर करण्यात आलेल्या भरतनाट्यम् नृत्य रचना आणि त्यापाठोपाठ अतिशय आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आलेले संतूर वादन यामुळे भरत नाट्य मंदिर येथील उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले. नूमवीय ७६ तर्फे सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने भरत नाट्य मंदिरात हा ‘नुपूर नाद’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.

नूमवीय ७६चे विद्यार्थी डॉ धनंजय दैठणकर, त्यांच्या पत्नी डॉ स्वाती दैठणकर यांनी आपली मुले व शिष्य असणाऱ्या निनाद आणि नूपुर बरोबर अनोखा संतूर आणि भरतनाट्यम् नृत्याचा उत्कृष्ट कार्यक्रम सादर केला. धनंजय आणि स्वाती ह्यांच्या एकूण एकोणीस नृत्यप्रकल्पातील काही आगळ्या रचना स्वाती आणि नूपुर ह्यांनी सहकलाकारांसह मनोवेधक नृत्यसंरचनद्वारे साकारल्या.तेजोनिधी स्वामी विवेकानंद,सुरश्याम रंग, नृत्यबानी, राजस सुकुमार, नूपुर नाद आदी नृत्य प्रकल्पातील रचना प्रभावीपणे सादर झाल्या.नृत्यवादनात चैत्राली पांडे,
राजलक्ष्मी बागडे, मैथिली साने,साक्षी आपटे, रेवा बोधे, दुर्गा कुलकर्णी, शलाका माडगे, तन्वी गोडसे यांचाही सहभाग होता

धनंजय आणि निनाद ह्यांनी संतूर सहवादानामध्ये राग सादर केला. त्यांना विनीत तिकोनकर ह्यांनी तबला व पखवाज ची साथ केली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निनाद दैठणकर ह्यांनी बॉलिवूड क्लासिक रचना सादर केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी संतूर नृत्याची अनोखी जुगलबंदी दैठणकर कुटुंबियांनी एकत्रित पणे अत्यंत मनोवेधक पद्धतीने सादर केली. त्याला सर्व रसिकांनी उभे राहून दाद.दिली. या कार्यक्रमासाठी ध्वनी व्यवस्था प्रशांत उरुणकर तर प्रकाशयोजना तेजस देवधर ह्यांची होती.  

   सदर कार्यक्रमासाठी उदय साने,अभय जबडे,मुकुंद धारूरकर आणि इतर मित्रांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम पार पडला

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा