*रिपब्लिकन पक्षाचा ६९वा वर्धापन दिन पुणे शहरात उत्साहात साजरा*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

*रिपब्लिकन पक्षाचा ६९वा वर्धापन दिन पुणे शहरात उत्साहात साजरा*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पुणे शहराच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचा ६९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, बाबूराव घाडगे, शाम सदाफुले, नगरसेविका हिमाली कांबळे, नगरसेवक निलेश आल्हाट, नगरसेविका निशा मानवतकर, माजी नगरसेवक संतोष आरडे, सुनील गवळी, विनोद टोपे, अविनाश कदम, ख्रिस्टोपर राजमनी, संजय पटणपल्लू, मीनाज मेमन, चांदणी गायकवाड, रेश्मा शेख, डोर्थी थॉमस, अक्षय अवसरमल, भीमराव वाघमारे, निलेश रोकडे, फिरोज खान, अतुल भालेराव, आशिष भोसले, सरिता कुंभार, खंडू शिंदे, गोविंद साठे, बाळासाहेब खंकाळ, जितेश दामोदरे, निकाळजे ताई, आरती देटे, हर्षा लोंढे, अयुब जहागीरदार, संग्राम साळवे, ईश्वर आढाव, अरुण पवार, लिंबा कावरे, सुभाष शिंदे, विक्की वाळके यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या विचारधारेप्रती बांधिलकी व्यक्त करत उपस्थितांनी रिपब्लिकन चळवळीला अधिक बळकटी देण्याचा निर्धार व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा