चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारा येथे इंटक फेडरेशनचे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात पार पडली
चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारा येथे इंटक फेडरेशनचे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात पार पडली
कामगारांच्या हक्कासाठी संघटनात्मक बळकटीकरणाचा निर्धारासाठी चंद्रपूर लोहारा येथे भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस महासंघ इंटक फेडरेशनचे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न झाले.
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. हौशीलाप्रसाद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ॲड. शैतानसिंग सोलंकी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अवनीश त्यागी यांच्या उपस्थित अधिवेशन पार पडले.
सामाजिक सुरक्षा. रोजगाराच्या संधी. कामगार कल्याण तसेच असंघटित व कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगारांच्या विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडून प्रश्न शासन व प्रशासनाच्या स्तरावर प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यांच्या कायदेशीर हक्कांची जाणीव करून देणे. संघटनात्मक पातळीवर कामगारांना एकत्र आणणे आणि कामगार कल्याण साठी सातत्याने कार्य करण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात इंटकच्या संघटनात्मक कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा संकल्प दत्तात्रय समर्थ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.
या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. सुभाष माछरे, प्रदेश युवा अध्यक्ष प्रशिक कांबळे, प्रदेश सचिव सुचिता कुलकर्णी, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष व नागपूर प्रभारी दत्तात्रय समर्थ, पंजाब चंदिगडचे प्रदेशाध्यक्ष डॉ. मनोहर सिंग, छत्तीसगड प्रदेशाध्यक्ष सुखवन कश्यप, छत्तीसगड महिला प्रदेशाध्यक्षा संतबाई उईके, झारखंड महिला प्रदेशाध्यक्षा जयंती दास, हिमाचल प्रदेशाध्यक्ष नरेंद्र कुमार, मध्य प्रदेश अध्यक्ष कैलास गोयल, गुजरात प्रदेशाध्यक्ष श्री भाटिया, तेलंगणा प्रदेश अध्यक्ष रामकृष्ण रेड्डी, प्रदेश कुमार महावंशी, विजेंद्र ठाकूर, महासचिव डॉ विनायक पावसकर, अकोला जिल्हाध्यक्ष व अमरावती विभाचे पद्माकर वासनिक, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ताजुद्दीन खातीब, वाशिम जिल्हाध्यक्ष संदीप थोटे, वर्धा जिल्हाध्यक्ष प्रशांत गहूकर, उमेश राठोड, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सुवर्णा माने, युवा अध्यक्ष प्रतीक पवार, रोहित कुंभार, चेतन कामडे, प्रफुल उज्वलवार, सौरभ वाढई, दुर्वास कडस्कर, सतीश सुंकरवार, निकेश सुखदेवे, किरण पोरेड्डीवार, अनिल कुंटावार, प्रशांत झुरमुरे, आकाश ठाकरे, साईनाथ जिडगेलवार, फुलचंद गोंगले, अनिल निकोडे, हरीश गोविंदवार, उपस्थित होते.
Comments
Post a Comment